डाॅक्युमेंट्रीमुळे मोदींचा संताप झाल्याने बीबीसीवर (BBC) कारवाई : आ. पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
बीबीसी कार्यालयावरील कारवाई अत्यंत दुर्दैवी अशी आहे. स्वतंत्र मिडियावर दडपण आणण्याचे चालले आहे. ब्रिटीन सरकारची ही कंपनी आहे. छापा टाकून काही सापडणार नाही, केवळ दहशत निर्माण करायची. मोदींच्या विरोधात जी डाॅक्युमेंट्री केली, त्यामुळे मोदींचा संताप झाला आहे. सगळ्या वृत्तवाहिन्या विकत घेतल्या आहेत. स्वतंत्र मिडिया मोदींना सहन होत नाही. याचे हे उदाहरण असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.

कराड (ता. कराड) येथे काॅंग्रेसच्या हाथ से हाथ जोडो अभियानाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रयत कारखान्याचे संचालक अॅड. उदयसिंह पाटील, कराड उत्तरचे अध्यक्ष निवास थोरात, सरपंच मृणालिनी मोहिते, शिवराज मोरे, ऋतुराज मोरे, भानुदास माळी, इंद्रजित चव्हाण, अजित पाटील (चिखलीकर), अमित जाधव, उमेश मोहिते, सरपंच संग्राम पवार आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/733640084800893

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपा अन् मोदींना लोकशाहीची नको आहे. त्यामुळे चाैथा स्तंभ अन् पाचवा स्तंभ कुठे राहिला. लोकशाहीची मोडून टाकायची आहे. डाक्युमेंट्रीला उत्तर देण्याऐवजी त्या कंपनीवर छापे टाकणे अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले.

मोदींना 2024 मध्ये प्रतिस्पर्धी नसल्याच्या अमित शहा वक्तव्यावर प्रतिक्रिया 
घमेंडीमध्ये असे बरेच लोक असतात. त्याच काय झालं ते जगाने पाहिले आहे. त्यांना वल्गना करायच्या तेवढ्या करू द्या, आमची 2024 ची तयारी सुरू असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

चीनने भारताचा प्रदेश बळकावला ः पृथ्वीराज चव्हाण
मोदी सरकारच्या काळात चीनने आक्रमण करून भारताचा प्रदेश बळकावला आहे. गलवान, तवान, अरूणाचल, लडाखमध्ये प्रदेश बळाकावलेला असताना मोदी बोलायला तयार नाहीत. महाराष्ट्रात एकही उद्योग येत नाही, अन् देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.