औरंगाबाद | बदलत्या वातावरणामुळे शहरांमध्ये डेंग्यू, मलेरिया, काविळ या साथी रोगांचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट गेली असून तिसरा लाटेचा धोका कायम आहे. या पावसाळ्याच्या वातावरणामुळे सध्या शहरात साथ रोगांची सुरुवात झाली असून, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे.
या रुग्णांवर उपचार करताना त्यांची कोरोना चाचणी करावी असे आदेश मनपाने लेखी पत्राद्वारे दोन वेळा खाजगी रुग्णालयांना दिले आहे. परंतु रुग्णालयाकडून कोरोना चाचणीच्या आदेशाकडे लक्ष दिले जात नाही. मनपाने शहरातील 996 रुग्णालयांना हे पत्र पाठवले होते रुग्णांची चाचणी करण्याचे आदेश दिले होते.
रुग्णालयाकडून कोरोना चाचणी करण्याचे रुग्णास सांगण्यात येत नाही. यासंदर्भात मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दोन वेळा पत्राद्वारे साथरुग्णांची करोना चाचणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु अजूनही रुग्णालयाकडून या गोष्टीवर गांभीर्य घेतले जात नाही.