लॉकडाऊन मुळे एक वेळेच्या जेवणासाठी फिरावे लागते दारोदारी

local issue
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | उस्मानपुरा नागसेनगर या विभागातील महिलांनी संताप व्यक्त केला आहे. वाढत्या लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नाही कामावर गेले असता पोलीस घरातराहा असं सांगतात मोलकरणींना वेतन नाही. दोन वेळेची जेवण पोटाला मिळत नाही जगावे कि मरावे हा प्रश्न पडलाय. काही महिलांनी प्रतिक्रिया द्वारे सांगितले व्यवृद्ध अवस्थेत कोण मदत करणार आणि अशा अवस्थेत कस काम करणार हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

लॉकडाऊन लावा पण गरीबाचा ही विचार करा अन्यथा उपासमारीने आमच्यावर मरण्याची वेळ आहे. तसेच भाड्याने राहत असल्याने भाडे ही थकले असून एवढे भाडे कसे भरावे. सरकाने चालवलेल्या योजना आम्ही अशिक्षित असल्यामुळे आमच्यपर्यंत पोहचत नसून उपासमारीने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

वयाच्या 65 व्या वर्षी मुलाने आम्हाला घराबाहेर काढले उदरनिर्वाह कसा करावा कसे जगावे हाच प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांचे शिक्षणचा खर्च कसा करावा शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शिक्षण ही थांबले आहे.सरकारने दारूच्या दुकानावर बंदी केली असून अजूनही दारू छुप्या पद्धतीने सुरूच आहेत. पण मोलकरीनीच्या हातावर काम नाही. वाढत्या कोरोना संसर्गा मुळे कोणी काम देत नाही. दारोदारी भीक मागण्याची वेळ आली आहे. आणि अशीच जर परिस्थिती अजून राहिली तर आत्महत्या ही करायची वेळ आमच्यावर येईल