हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सप्टेंबर किंवा ऑक्टोबर गणपती आणि दुर्गामाता यांच्या आगमनाचा महिना असतो . ऑक्टोबरचा हा महिना देवी दुर्गेच्या विविध रूपांना समर्पित आहे. नवरात्री विशेष म्हणजे देवीच्या नऊ रूपांची पूजा करणारा एक पवित्र सण. ज्या काळात भक्तजन उपवासी राहून देवीची आराधना करतात. सांस्कृतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सुद्धा देवीची अनेक मंदिरे पाहण्यास मिळतील . पण ठराविक मंदिरे सोडली तर काही मंदिरे भक्तांना माहीतच नाहीत . आज आम्ही पुण्यातील देवीच्या ठराविक स्थळांची माहिती सांगणार आहोत. जिथे तुम्ही नवरात्रीच्या काळात जाऊ शकता.
1) दुर्गादेवी मंदिर –
दुर्गादेवीचे मंदिर पुण्यातील दत्तवाडी येथे असणारे प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर आहे. दुर्गामाता भारतीय संस्कृतीत शक्ती, समर्पण आणि साहसाचे प्रतीक मानली जाते. हि देवी दहा फुटाची असून , या मंदिराची शिल्पकला आणि स्थापत्यकला आकर्षक आहे. मंदिराचा रांगेत असलेला गर्भगृह आणि भव्य मंडप भक्तांना आकर्षित करतो. नवरात्र महोत्सव दरम्यान, येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे केले जातात. या काळात भक्तांची मोठी गर्दी असते. हे मंदिर भक्तासाठी सकाळी 6 ते 12 आणि दुपारी 4 ते 9 पर्यंत खुले असते. या मंदिराला तुम्ही बस, टॅक्सी किंवा खासगी वाहनाने सहजपणे जाऊ शकता.
2) कामाक्षी देवी मंदिर –
कामाक्षी देवी भारतीय हिंदू धर्मातील शक्तीच्या देवींपैकी एक मानली जाते, जिची पूजा ज्ञान, प्रेम आणि समर्पणासाठी केली जाते. या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मंदिराचे वास्तुशिल्प अत्यंत आकर्षक असून , ज्यामध्ये विविध देवी-देवतांचे मूळ चित्रण केले आहे. या मंदिराचा परिसर हिरवागार असून, शांत वातावरणमुळे भक्तांना ध्यान करण्यास आणि शांती अनुभवण्यास उत्तम आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात, येथे विशेष पूजा, हवन, आणि धार्मिक अनुष्ठाने आयोजित केली जातात. भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. करवे रोडवरील स्थितीमुळे या मंदिराला बस, टॅक्सी किंवा खासगी वाहनांनी जाता येईल.
3) भवानी माता मंदिर –
भवानी मातेचे हे मंदिर 1763 मध्ये बांधले . हे शक्तीच्या देवींच्या रूपांपैकी एक मानले जाते, जिचा आशीर्वाद भक्तांच्या संरक्षणासाठी आणि समृद्धीसाठी घेतला जातो. मंदिरात नित्य पूजा, अभिषेक, आणि आरती नियमितपणे पार पडतात. देवीच्या विशेष उत्सवांमध्ये विशेष पूजा विधी केले जातात. या मंदिरात महापूजा केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते असे अनेकांचे मानने आहे. पुण्यातील विविध सार्वजनिक वाहने किंवा खासगी वाहने वापरून मंदिरापर्यंत जाता येते. हे मंदिर सकाळी 6 ते 12 आणि दुपारी 4 ते 9 पर्यंत भक्तांसाठी ओपन असते.
4) चतु:श्रुंगी माता मंदिर –
या देवीचे मंदिर पुण्यातील चतु:श्रुंगी रोड, मुळशी या ठिकाणी आहे. मंदिराच्या वास्तुकलेत भारतीय स्थापत्य शैलीचा समावेश आहे. मंदिराच्या परिसरात सुंदर बागा आणि निसर्गरम्य वातावरण असून , भक्तांना अधिक प्रभावित करते. नवरात्राच्या काळात येथे उत्सव साजरे केले जातात. चतु:श्रुंगी माता मंदिर हे पुण्यातील भक्तांसाठी एक अनन्य स्थान म्हणून ओळखले जाते. हे मंदिर 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद असून ते शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. त्याच प्रमाणे हे मंदिर लाल विटांनी बांधले असून त्याचे आकर्षण वाढत आहे. या मंदिराला 170 च्या आसपास पायऱ्या आहेत. हे मंदिर सकाळी 5:30 ते 9:00 पर्यंत आणि दुपारी 12:00 ते 7:00 पर्यंत खुले असते.