Dussehra 2024 | दसऱ्याला शस्त्रपूजन का केले जाते ? जाणून घ्या इतिहास आणि यंदाचा शुभमुहूर्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dussehra 2024 | आपल्या भारतामध्ये प्रत्येक सण हा मोठ्या उत्सवाने आणि आनंदाने साजरा केला जातो. कारण आपल्या प्रत्येक सणामागे एक इतिहास आणि संस्कृती दडलेली असते. आणि तीच संस्कृती पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी आणि आपला वारसा पुढच्या पिढीच्या हातात देण्यासाठी प्रत्येक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हे नवरात्रीचे सेलिब्रेशन चालू आहे. आणि दसरा (Dussehra 2024) देखील आता येणार आहे. हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या शुल्क प्रतीपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. आणि दशमीच्या दिवशी दसरा (Dussehra 2024) साजरा केला जातो. म्हणूनच त्याला विजयादशमी असे म्हणतात.

पुराणानुसार या दिवशी श्री राम प्रभूंनी लंकेचा राजा रावणाचा वध केला होता. त्याचप्रमाणे दुर्गा मातेने महिषासुरा या राक्षसाचा देखील वध केला होता. म्हणजेच विजय मिळवला होता. म्हणूनच या दिवशी दसरा (Dussehra 2024) साजरा केला जातो. हा दुसरा संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी श्री रामप्रभू आणि दुर्गा मातेने त्यांच्या शस्त्रांचा वापर करून या वाईट गोष्टींवर विजय मिळवला होता. त्यामुळे असे म्हणतात की, या दिवशी घरातील शस्त्रांची पूजा केली जाते. तसेच आपट्याची पाने देऊन थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेतले जातात. त्याचप्रमाणे या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम देखील केला जातो. सगळ्या वाईट गोष्टींवर मात करून चांगल्या गोष्टी कशा आत्मसात करायच्या. या गोष्टी आपल्याला दसऱ्याच्या निमित्ताने शिकता येतात. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी पुस्तके तसेच आपल्याला ज्ञान देणाऱ्या सगळ्या गोष्टींचे पूजन करून आपल्या ज्ञानामध्ये अशीच वृद्धी व्हावी असे देखील म्हटले जाते. यावर्षी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आलेले आहे. त्यामुळे दसरा (Dussehra 2024) नक्की कधी साजरा करायचा? याबाबत अनेक लोकांमध्ये गोंधळ चालून झालेला आहे. परंतु आता दसरा या वर्षी कधी साजरा केला जातो? आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

दसऱ्याचा शुभमुहूर्त कोणता ? | Dussehra 2024

हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील दशमी ही 12 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. त्यामुळे यावर्षी 12 ऑक्टोबरला दसरा होणार आहे. सकाळी 10 वाजून 59 मिनिटांपासून ही दशमी सुरू होणार आहे. तर 13 ऑक्टोबर सकाळी 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत ही दशमी असणार आहे. 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजून 30 मिनिटे ते 2 वाजून 49 मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे. तर पूजेचा मुहूर्त हा 1 वाजून 17 मिनिटांपासून ते 3 वाजून 35 मिनिटापर्यंत आहे. या काळात तुम्ही पूजा देखील करू शकता.

दसऱ्याला शस्त्रपूजन का केले जाते?

दसरा (Dussehra 2024) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी अनेक चांगली कामे केली जातात. पूर्वी क्षत्रिय युद्धवर जाण्यापूर्वी दसऱ्याची वाट पाहत होते. कारण या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता. तसेच दुर्गा मातेने देखील महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी जर युद्धाला सुरुवात केली, तर लोकांना विजय नक्कीच मिळतो. असे मानले जाते. त्यामुळे अनेक लोक पूर्वी हे राजे दसऱ्यानंतर युद्ध करायला जात आहे. आणि त्यामुळेच युद्धावर जाण्यापूर्वी या दिवशी लोक त्यांच्या शस्त्रांचे पूजन करत होते. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची प्रथा पडलेली आहे.

दसऱ्याच्या दिवशी काय करावे ? | Dussehra 2024

दसऱ्याच्या दिवशी विशेषतः श्रीराम प्रभूंची पूजा केली जाते. तसेच घरी राम दरबाराची स्थापना केली जाते. हे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच दसऱ्याच्या दिवशी सुंदर कांड केले जाते आणि रामचरितमानसाचे पठण देखील केले जाते. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी हनुमानजी आणि शनि देवाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे जीवनातील अनेक त्रासांपासून तुम्हाला मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी 7 लवंगा , 7 कापूर आणि 5 तमालपत्र एकत्र जाळून त्याचा घरभर दूर पसरवा. जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल. तसेच विजयादशमीच्या दिवशी जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावला. आणि त्यातील तीळ टाकले तर ते देखील खूप चांगले असते.