E – Shram Card Scheme | सरकार हे देशातील विविध वर्गातील लोकांचा विचार करून अनेक योजना आणत असतात. त्यांच्या आर्थिक त्याचप्रमाणे सामाजिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्यासाठी काय फायद्याचे आहे. भविष्यात जाऊन त्यांना या गोष्टीचा कसा आर्थिक फायदा होईल? या सगळ्याचा विचार करूनच केंद्र सरकारमार्फत अनेक योजना आणल्या जातात. यातील एक योजना म्हणजे ई श्रम कार्ड (E – Shram Card Scheme) योजना. ही योजना सरकारने देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांनी मजुरांना एकत्र आणण्यासाठी आणलेली आहे. सरकारच्या या ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक मदत मिळते. आतापर्यंत या ई श्रम पोर्टलवर 28.42 कोटी लोकांची नोंदणी झालेली आहे.
सरकारच्या या योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक मदतीसोबतच केंद्र सरकारकडून 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा देखील मिळतो. देशातील सर्व मजूर, फेरीवाले, भाजीविक्रेते, घरगुती कामगार हे सगळे या ई श्रम योजनेचा लाभ घेऊ शकतात. पण जर कोणी कर भरत असेल किंवा व्यावसायिक क्षेत्रात असेल, तर त्यांना मात्र सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ई श्रम कार्ड योजनेचे फायदे | E – Shram Card Scheme
या ई लेबर पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर काही दिवसांनी तुमच्यासाठी मजूर आणि कामगारांचे कार्ड बनवले जाईल. या पोर्टलच्या अंतर्गत सर्व मजूर एकाच ठिकाणी जोडले जातात. ही योजना सुरू केल्यास भविष्यात नोंदणी झालेल्या कामगार आणि मजुरांना लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत नागरिकांना 2 लाख रुपयांचा अपघात विमा देखील दिले जातो. अपघातात जर कामगारांचा जीव गेला, तर त्यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये दिले जातात. परंतु जर कामगार काही अपंग कामगारांना अपंगत्व प्राप्त झाले. तर त्यांना 1 लाख रुपयांची मदत सरकारकडून दिली जाते.
अर्ज कोण करू शकतात ? | E – Shram Card Scheme
देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार या ई श्रम कार्ड योजनेसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजदारी कामगार, भूमिहीन शेतमजूर इत्यादी लोक या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात आणि सरकारच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.