HDFC च्या या फंडात गुंतवणूक करून कमवा लाखो रुपये; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

0
1
HDFC funds
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एचडीएफसी म्युच्युअल फंडाने (HDFC Mutual Fund) एप्रिल २०२३ साली सुरू केलेल्या दोन नव्या योजना आजही सांगण्यास लोकप्रिय राहिल्या आहेत. एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड आणि एचडीएफसी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंड या दोन्ही योजनांनी भारतीय शेअर बाजारातील लहान व मध्यम कंपन्यांमधील गुंतवणुकीस चालना दिली आहे. आज आपण याच योजनांविषयी जाणून घेणार आहोत.

एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड हा भारतातील २५१ व्या ते ५००व्या क्रमांकाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. स्मॉलकॅप कंपन्या प्रामुख्याने वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात. त्यामुळे मोठ्या परताव्याची शक्यता अधिक असते. या फंडाने लाँचपासून ४७.३२% परतावा दिला आहे. तर मागील एका वर्षातील सरासरी परतावा २५.९३% दिला आहे.

हा फंड जोखीम पत्करणाऱ्या आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे. महत्वाचे म्हणजे, ३ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी गुंतवणूक करण्याची तयारी असलेल्यांनी या फंडाचा विचार करू शकतात.

त्याचबरोबर, एचडीएफसी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंड हा १०१व्या ते २५०व्या क्रमांकाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. मिडकॅप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची क्षमता असते. त्यामुळे लार्ज-कॅप कंपन्यांच्या तुलनेत अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते. या फंडाने लाँचपासून ४१.३५% परतावा दिला आहे. तर मागील एका वर्षातील सरासरी परतावा २३.६०% दिला आहे. कमी जोखीम घेऊन तुलनेने स्थिर परतावा मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड चांगला आहे.

कुठला फंड निवडावा?

जर गुंतवणूकदाराची जोखीम पत्करून अधिक परतावा मिळवण्याची तयारी असेल तर स्मॉलकॅप फंड हा चांगला पर्याय आहे. तर, कमी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मिडकॅप फंड अधिक योग्य ठरू शकतो. सध्या या दोन्ही योजना चांगला परतावा देत आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांनी ठरवावे कशामध्ये गुंतवणूक करायची.