काय सांगता! लग्नात परदेशी लोकांना आमंत्रित करुन मिळवा बक्कळ पैसा; जॉईन माय वेडिंगची कमाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचे लग्न खूप थाटामाट आणि धूमधडाक्यात संपन्न व्हावे. परंतु आर्थिक गणितामुळे हे प्रत्येकालाच शक्य होत नाही. मात्र आता जॉईन माय वेडिंग (Join my weeding) या वेबसाईडमुळे हे शक्य झाले आहे. इतकेच नव्हे तर, या वेबसाईडमुळे फक्त नातेवाईकच नाही तर विदेशी मंडळी देखील  लग्नात सहभागी होऊ शकतात. आणि विशेष म्हणजे ते आपल्याला लग्नात सहभागी केल्याच्या मोबदल्यात बक्कळ पैसाही देतात.

सध्या भारतात एक नवीनच ट्रेंड दिसून येत आहे. भारतातील लोक आपल्या लग्नात नातेवाईक कमी पण फॉरेनर व्यक्तींना जास्त आमंत्रित करीत आहेत. ज्या फॉरेनर्सला ते स्वताही ओळखत नाही. याचे कारण असे की, हे फॉरेनर्स लग्नात सहभागी होण्यासाठी समोरील पार्टीला हवा तो मोबदला देत आहेत. तसेच त्यांच्या इतर इच्छाही पूर्ण करत आहेत. भारतातील लग्नाचा थाट हा किती वेगळा असतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे अनेक फॉरेनर्स व्यक्तींना भारतातील विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होण्याची इच्छा असते. मात्र भारतात नातेवाईक नसल्यामुळे त्यांना यामध्ये सहभागी होता येत नाही. दुसऱ्या बाजूला अनेक मंडळी पैशांच्या अभावी आपले लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पाडतात.

या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून जॉईन माय वेडिंग ही वेबसाईट अस्तित्वात आली आहे. ज्या व्यक्तींना लग्न करण्यासाठी पैशांची गरज आहे आणि ज्यांना आपल्या लग्नात फॉरेनर्स हवे आहेत असे व्यक्ती या वेबसाईटवर आपल्या विवाहाची नोंदणी करतात. आणि या माध्यमातून फॉरेनर्सला आपल्या विवाह सोहळ्यात आमंत्रित करतात. पुढे हे फॉरेनर्स लग्नात सहभागी होण्यासाठी मोबदला देखील देतात. यामुळे ज्याला आपले लग्न थाटामाटात हवे आहे. ते या पैशांमधून आपली इच्छा पूर्ण करुन घेतात. या फॉरेनर्सला आणण्याचे काम जॉईन माय वेडिंग ही वेबसाईट करते. त्यांची पूर्ण जबाबदारी वेबसाईट घेते. सध्या जॉईन माय वेडिंगचा ट्रेंड दिल्ली, मुंबई, जयपूर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.