Earthquake in Marathwada : मराठवाड्यात भूकंपाचे धक्के!! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा भाग असलेल्या मराठवाड्यात भूकंपाचे धक्के (Earthquake in Marathwada) बसले आहेत. मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात आज सकाळी ६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवू लागले. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी होती. अचानक आलेल्या या भूकंपांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले तसेच नागरिक घराबाहेर पडून धावू लागले.

भूकंपाची उत्पत्ती १० किलोमीटर खोलीवर- Earthquake in Marathwada

या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना जाणवली आहे. भूकंपाची उत्पत्ती १० किलोमीटर खोलीवर झाली आहे. घरांच्या भिंतीना छोट्या भेगा गेल्याची माहिती आहे. यामुळे नागरिक चांगलेच घाबरले. आपला जीव वाचवण्यासाठी नागरिक इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात विद्वंस झालेला नाही, त्यामुळे दिलासा मिळाला आहे. महत्वाची बाब म्हणजेच यापूर्वी सुद्धा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या भागात भूकंपाचे सौम्य धक्के (Earthquake in Marathwada) जाणवले होते.

दरम्यान, आज पहाटे मराठवाड्यासोबत अरुणाचल प्रदेशात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले. तब्बल २ भूकंपाने अरुणाचल प्रदेश हादरला. यामध्ये सर्वात आधी मध्यरात्री १ वाजून ४९ मिनिटांनी पहिला भूकंप झाला, या भूकंपाची तीव्रता ३. ७ रिश्टर स्केल इतका होता. या भूकंपाची खोली १० किलोमीटर होती. तसेच भूकंपाचा केंद्र अक्षांश २७. ३८ आणि रेखांश ९२. वर होता.