East Central Railway Recruitment 2024 | खेळाडूंना रेल्वेत नोकरीची मोठी संधी, तब्बल ‘एवढ्या’ जागांसाठी भरती सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

East Central Railway Recruitment 2024 | बऱ्याचदा अनेक विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अभ्यासापेक्षा खेळायला जास्त महत्त्व देतात. आणि पुढे जाऊन ते खेळाडू बाण्याता. तरी देखील त्यांना अनेक लोक बोलत असतात की खेळाने करिअर होत नाही. परंतु आता याच खेळाडूंसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता खेळाचा किडा असणाऱ्या याच उमेदवारांना नोकरीची एक संधी मिळालेली आहे. ती म्हणजे आता पूर्व मध्यरेल्वे प्रशासनाने क्रीडा व्यक्ती पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता जे कोणी खेळाडू आहेत ते या पदासाठी अर्ज करू शकतात.

यामध्ये एकूण 56 मध्ये भरली जाणार आहे त्याचप्रमाणे 26 फेब्रुवारी 2024 ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. त्यामुळे आता थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. आता या भरतीचे सविस्तर माहिती आपण पाहूया.

महत्वाची माहिती | East Central Railway Recruitment 2024

  • पदाची नाव – क्रीडा व्यक्ती
  • पदसंख्या – 56
  • वयोमर्यादा – 18 ते 25
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या

  • हा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे
  • अर्जासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची देखील जोडणी करायची आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करता तुम्ही पीडीएफ मधील जाहिरात पहावी.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा