एप्रिल महिन्यात फिरायचं प्लान अजून ठरवलेलं नसेल, तर चिंता करू नका – कारण तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मुंबईच्या आसपासची काही सुंदर ठिकाणं, जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये एक छोटीशी पण मजेशीर सहल करू शकता. ईस्टर वीकेंडचा आनंद उठवण्यासाठी हे ठिकाणं एकदम योग्य पर्याय ठरू शकतात. या ट्रिपसाठी तुम्ही ट्रॅव्हल अॅप्सचा वापर करून बुकिंग सहज करू शकता आणि एक छोटासा ब्रेक घेऊन निसर्गाचा, शांततेचा आणि मस्त खाण्याचा अनुभव घेऊ शकता.
अलीबाग
मुंबईपासून केवळ काही तासांच्या अंतरावर असलेलं हे समुद्रकिनारी शहर, त्याच्या ऐतिहासिक किल्ल्यांमुळे, स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांमुळे आणि चविष्ट सी फूडमुळे प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही पॅरासेलिंग, जेट स्कीइंगसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. एक दिवस किंवा वीकेंड गेटवे म्हणून अलीबाग उत्तम पर्याय आहे.
लोणावळा आणि खंडाळा
महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी हे दोन ठिकाणं उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अधिकच सुंदर दिसतात. निसर्गरम्य वातावरण, धुक्याचे रस्ते आणि धबधबे यामुळे कपल्स, कुटुंबं आणि सोलो ट्रॅव्हलर्ससाठीही ही ठिकाणं आदर्श आहेत. ईस्टर वीकेंडसाठी हिलटॉप विला किंवा ग्लॅम्पिंगचा अनुभव घेण्याची संधी गमावू नका.
माथेरान
माथेरान हे भारतातील एकमेव ऑटोमोबाईल-फ्री हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही घोड्यांची सवारी, टॉय ट्रेन आणि प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण पॉल्युशन फ्री असून तुम्हाला एक शांत, आल्हाददायक वातावरण देते. ट्रिपसाठी एक परिपूर्ण निवड!
कास पठार
कास पठार, युनेस्कोच्या वर्ल्ड नॅचरल हेरिटेज स्थळांपैकी एक आहे. येथे फुलांची रंगीबेरंगी चादर पसरलेली दिसते. मुंबईपासून जवळच असून कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. खास करून निसर्गप्रेमींनी हे ठिकाण नक्की पहावं.
ट्रॅव्हल टिप्स
- ट्रिप आधी बुक करून ठेवा.
- हवामानानुसार कपडे घ्या.
- कॅश आणि डिजिटल पेमेंट दोन्ही सुविधा ठेवा.
- ट्रिप प्लॅन करताना स्थानिक अन्नाचा अनुभव घ्यायला विसरू नका!




