साध्या हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे या दिवसात विविध प्रकारच्या पालेभाज्या,फळभाज्या बघायला मिळतात. त्यातही 12 महिने बाजारात उपलब्ध असणारी भाजी म्हणजे फ्लॉवर आणि कोबी… ह्या दोन्हीही भाज्या खाणे आरोग्यासाठी हितकारक असते. मात्र ह्या भाज्या साफ करणे म्हणजे मोठे कटकटिचे काम.
कोबी फ्लॉवर यासारख्या भाज्या जमिनीला लागूनच उगवतात त्यामुळे त्याच्यामध्ये कीटक आढळण्याचे प्रमाण आधीक असते. या दोन्हीही भाज्यात अनेकदा अळ्या आणि जर तुम्ही बरकाईने पाहिले तर त्यांची अंडी सुद्धा दिसतील.
मात्र हे सर्व नीट नाही साफ झाले तर तुम्हाला मोठ्या समस्या येऊ शकतात. त्यामुळे, जुलाब,पोटदुखी, उलटी ऍलर्जी सुद्धा होऊ शकते. एवढेच नाही तर कोबी मधले कीटक हे दीर्घाकाल मेंदूमध्ये राहिल्याचे सुद्धा तुम्ही ऐकले असेल. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात कोबी आणि फ्लॉवर साफ करण्याच्या काही सोप्या आणि प्रभावी पद्धतीबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया….
फ्लॉवर कसा स्वच्छ करायचा?
- नेहमी ताजा फ्लॉवर खरेदी करा. असा फ्लॉवर विकत घेऊ नका ज्यावर डाग आहे किंवा ते खाल्लेले दिसत आहे. भाजी बनवण्यापूर्वी फुलकोबीचे छोटे तुकडे आपल्या हातांनी करावेत म्हणजे त्यात काही कीटक असेल तर ते तुम्हाला दिसेल. फ्लॉवरच्या आतील अळीचा रंग हलका हिरवा असतो.
- बऱ्याचदा भाजीतल्या आळ्या दिसत नाहीत म्हणून भांड्यात पाणी घाला आणि त्यात फ्लॉवर आणि थोडे मीठ घाला. आता गॅसवर एक मिनिट उकळा. असं केल्याने सर्व कीटक मरतील आणि बाहेर येतील. याशिवाय भाज्यांवरील कीटकनाशकांचा प्रभावही संपेल.
आता नळाच्या वाहत्या पाण्याखाली पुन्हा एकदा पूर्णपणे स्वच्छ करा. तुम्हाला हवे असल्यास बर्फाच्या पाण्यात एक मिनिट ठेवूनही तुम्ही ते स्वच्छ करू शकता. यामुळे फ्लॉवर शिजवताना ओलसर होणार नाही. तुम्ही त्याला फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत देखील ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला भाजी किंवा फ्लॉवरचा पराठा बनवायचा असेल तेव्हा तुम्ही बनवू शकता. जर तुम्ही ब्रोकोली खात असाल तर त्याला देखील याच पद्धतेने स्वच्छ करा.
कोबी कशी स्वच्छ करावी?
आधी कोबी कापून घ्या. एका भांड्यात पाणी टाकून ठेवा आणि दोन ते तीन वेळा चांगले धुवा. आता एका भांड्यात पाणी घेऊन. त्यात १-२ चमचे व्हाईट व्हिनेगर घाला. त्यात चिरलेला कोबी घाला आणि दोन-तीन मिनिटे सोडा. जंतू, बॅक्टेरिया आणि बुरशी दूर करण्यासाठी व्हिनेगर प्रभावी ठरू शकते. यावरील किडे इतके लहान असतात की ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत पण ते पानांच्या आता असतात.