जिमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खावा; अशक्तपणा येणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या या धावपळीच्या जगात फिट राहण्यासाठी अनेक जण जिममध्ये जातात. काही लोक मनापासून जिम करून आपली बॉडी फिट ठेवतात तर काहीजण स्टैमिना कमी असल्याच्या कारणाने जिम सोडतात. काही जणांना थोडा वेळ जरी जीम केली तरी दम लागणे, श्वासोश्वास वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच कधी कधी अस्वस्थता जाणवते. अशा परिस्थितीत जर तुम्ही जिममध्ये जाण्यासाठी स्टॅमिना वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही पदार्थ खाऊ शकता. स्टॅमिना वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत याबाबत आपण जाणून घेऊया.

स्टॅमिना वाढवण्यासाठी हे पदार्थ खा.

केळी-

वजन वाढवण्याचा स्वस्तात मस्त उपाय म्हणजे केळी खाणे. परंतु पण केळी फक्त वाढवण्यासाठीच उपयुक्त नाही, तर त्यात आढळणारे फायबर आणि नैसर्गिक साखर देखील स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. केळांमध्ये फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आढळतात, जे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात.

बदाम-

बदाम हा पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. रोज बदाम खाल्ल्याने तुमच्या शरीराचा स्टॅमिना वाढतो. येव्हडच नव्हे तर बदामाचे सेवन केल्याने हाडेही मजबूत होतात आणि आपल्या रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.

कॉफी-

शरीराचा थकवा दूर करण्यासाठी कॉफी सर्वोत्तम मानली जाते. होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कॉफीचे सेवन केल्याने स्टॅमिना देखील वाढतो. कॉफीचे सेवन केल्याने शरीरातून अॅड्रेलिन हार्मोन बाहेर पडतो, जो स्नायूंना रक्त जलद पंप करण्यास मदत करतो. त्यामुळे जीमला जाणाऱ्यांनी रोज 2 कप कॉफी पिणे आवश्यक आहे.