स्टॅमिना वाढवण्यासाठी खावा ‘हे’ पदार्थ; तुम्हालाही होईल फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुरुषांमध्ये स्टॅमिना (Stamina) कमी होण्याचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. दगदगीच्या या धावपळीच्या या जीवनात पुरुषांचे त्यांच्या आहारावरील लक्ष कमी होत असून त्यामुळे त्यांना ऊर्जेची कमी भासत आहे. सतत येणारा थकवा कमी करण्यासाठी आहारामध्ये विशिष्ट पदार्थांना समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. तुमचा  सततचा थकवा कमी करण्यासाठी आवश्यक असलेली  मूलद्रव्य तुमच्या शरीरात आहार स्वरूपात जाणे गरजेचे असते.

शरीरामध्ये अधिक काळ उर्जा टिकविण्यासाठी आहारामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स, विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि कॅल्शियमची गरज भासते. याशिवाय शरीरामध्ये हायड्रेशन, नियंत्रित ब्लड शुगर पातळी, वेळेवर जेवणे आणि व्यायाम करणे स्टॅमिना टिकवून ठेवण्यास मदत करते. खालील प्रकारचे पदार्थ आहारात समाविष्ट  केल्याने तुमच्या शरीराच्या ऊर्जेची गरज भागणार आहे.

1) दही :

दुग्धजन्य पदार्थापैकी एक असलेले दही आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम पदार्थ आहे. जो की नेहमी आपल्या आपल्या आहारात असावा. दह्यात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, साखर, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम आढळून  येतात आपल्या आहार संतुलित करण्यात मदत  करतात. सोडियम  व पोटॅशिअम ही महत्वाची  मुलद्रव्य दही  मध्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर दह्यात 22% पर्यंत प्रथिने असतात. जे आपल्या शरीराला मजबुती  देण्यासाठी महत्वाची ठरतात. कॅल्शियम सारखे घटक आपली हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात. कार्बोहायड्रेट्स ऊर्जेचा स्रोत म्हणून काम करतात.

2) हिरव्या पालेभाज्या :

वर्षभर पालेभाज्या खाणे उत्तम ठरते. पालक, मेथी, लाल माठ, शेपू अशा भाज्यांमध्ये फायबर, लोह आणि बिटा कॅरेटीन भरपूर प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने शरीराला पौष्टिक तत्व मिळतात आणि पुरूषांच्या आणि महिलांच्या शरीरातील स्टॅमिना वाढण्यास मदत मिळते. यामध्ये असलेले लोह रक्ताची कमतरता पूर्ण करते आणि रक्तप्रवाह वाढवून शरीरामध्ये उर्जा राखून ठेवण्यास मदत करते.

3) केळी :

केळामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असून यात सोबत मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या महत्त्वाच्या घटनांचे प्रमाण देखील अधिक असते. केळी खाल्याने मेटाबॉलिजम अधिक चांगल्या प्रमाणात बुस्ट होते. व्यायामाच्या आधी केळ्याचे सेवन केल्याने शरीरातील एनर्जीची पातळी योग्य राखली जाते.