केस गळतीच्या समस्येला कंटाळा आहात? दररोज खा 1 पौष्टिक लाडू; 15 दिवसात केस होतील घनदाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अनेकवेळा योग्य आहार न घेतल्यामुळे, वाढत्या वयोमानामुळे, तसेच व्यवस्थित निगा न राखल्यामुळे केस गळतीची समस्या उद्भवून येते. त्याचबरोबर आजारांमुळे ही केस गळती सुरू होते. केस गळतीची समस्या थांबवण्यासाठी दररोज पौष्टिक आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. यात तुम्ही जर दररोज 1 पौष्टीक लाडू खाल्ला तर तुमची केस गळतीची समस्या कायमची दूर होईल. हा पौष्टिक लाडू आळशीच्या बीयांचा असेल तर याचे चांगले परिणाम लगेच दिसून येतील. आज आपण हाच पौष्टीक लाडू कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत.

लाडू बनवण्यासाठी साहित्य

बदाम- एक कप
भोपळ्याच्या बीया
सुर्यफुलाच्या बीया
आळशीच्या बीया
चिया सिड्स
खजूर

लाडू बनवण्याची कृती

  • सर्वात प्रथम एका कढईत बदामाचे काप, भोपळ्याच्या बीया, सुर्यफुलाच्या बीया, आळशीच्या बीया, चिया सिड्स भाजून घ्या.
  • या बिया एकदम खरपूस भाजून घ्या यानंतर त्यात खजुराचे तुकडे घाला आणि तेही भाजून घ्या त्यानंतर हे मिश्रण एका वाडग्यात काढा.
  • पुढे हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. यानंतर एका प्लेटमध्ये गरजेनुसार तूप घालून त्याचे लाडू वळून घ्या. तुमचे पौष्टीक लाडू तयार असतील.
  • हे लाडू दररोज खाल्ल्यामुळे तब्येत ही सुधारेल आणि केसांची समस्या दूर होईल.