हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Makar Sankranti 2025 – मकर संक्रांती हा भारतात साजरा होणारा महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी 14 जानेवारीला उत्साहात साजरा केला जातो. हा सण देशभरात विविध पद्धतीने आणि वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. यामध्ये एक महत्त्वाची परंपरा म्हणजे तिळगूळ बनवून खाणे आणि एकमेकांना तिळगूळ देत “तिळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला” असं म्हणणं. तिळगूळ खाण्यामागे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारणेही आहेत. मकर संक्रांती हा सण थंडीच्या हंगामात येतो, आणि तिळाचे सेवन थंडीच्या दिवसांत शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. तिळामध्ये अनेक पोषक घटक असून ते शरीराला विविध प्रकारे लाभदायक ठरतात. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
तिळ खाण्याचे फायदे ( health benefits )–
आजारांपासून बचाव –
तिळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. तिळाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, ऍसिडिटी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच तिळातील तेल पचनासाठी आवश्यक एंजाइम्सचे उत्पादन वाढवते. तसेच त्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, जे हाडे आणि दात मजबूत करतात. ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडांच्या आजारांपासून बचाव होतो. (Makar Sankranti 2025)
हृदयविकाराचा धोका कमी –
तिळात मोनोअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिड्स असतात, जे हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतात. तिळाचे सेवन केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच तिळामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात आणि सर्दी, खोकला यांसारख्या आजारांशी लढण्याची क्षमता वाढवतात.
त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त (Makar Sankranti 2025)–
(Makar Sankrant) तिळात आयर्नचे प्रमाण जास्त असल्यामुळे एनीमियापासून बचाव होतो. शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास तिळाचे सेवन लाभदायक ठरते. यात व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. तिळाचे सेवन केल्याने त्वचा मऊ, तजेलदार राहते आणि सुरकुत्या कमी होतात. यासोबतच प्रोटीन आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात, जे केस गळणे कमी करतात आणि केसांना नैसर्गिक चमक आणि ताकद देतात. तिळामधील मॅग्नेशियम मेंदूसाठी फायदेशीर असते. यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि मानसिक ताणतणाव कमी होतो.
थंडीपासून संरक्षण –
तिळात फायबर जास्त असल्यामुळे पोट भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तिळाचे सेवन फायदेशीर ठरते. तिळाची तासीर गरम असल्यामुळे हिवाळ्यात तिळाचे सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळते आणि थंडीपासून संरक्षण होते.
शरीराला फायदे मिळवून देणारी प्रथा –
तिळाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर असले तरी त्याचा अतिरेक टाळावा. जास्त प्रमाणात तिळ खाल्ल्यास काही आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तिळाचे सेवन योग्य प्रमाणात करावे. तसेच, कोणत्याही आरोग्यविषयक समस्येचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तिळाचे सेवन करावे. म्हणूनच मकर संक्रांतीच्या सणाला तिळगूळ खाणे ही केवळ परंपरा नसून शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळवून देणारी प्रथा आहे.
हे पण वाचा : देशवासियांना दिलासा!! केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठे बदल?