जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतो मुतखडा; करा ‘हे’ उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात किडनी स्टोनच्या आजाराचे प्रमाण वाढलं आहे. केवळ वयस्कर व्यक्तीच नव्हे तर तरुणांना सुद्धा किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. चुकीची जीवनशैली, पाण्यातील बदल, आहारातील अनियमितता हे किडनी स्टोनची मुख्य कारणे असली तरी तुम्हाला माहित आहे का कि मिठाचे जास्त प्रमाणात सेवन करणं सुद्धा किडनी स्टोनला निमंत्रण दिल्यासारखं आहे. त्यामुळे गाफील राहू नका. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे किडनी स्टोन वर मात करता येईल.

जास्त मीठ खाऊ नका-

किडनी स्टोन होऊ नये यासाठी जास्त मीठ खाऊ नका . जास्त मीठ खाल्ल्याने लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोटात स्टोन बनण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे आपण एका दिवसात 2300 mg पेक्षा जास्त मीठ वापरू नये. किडनी स्टोन टाळण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी 1500 मिलीग्राम मीठ योग्य आहे.

जास्त पाणी प्या-

किडनी स्टोन होऊ नये यासाठी तुम्ही भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. साधारपणे पणे आपण दररोज किमान 3-4 लिटर पाणी प्यावे. जास्तीच्या पाण्यामुळे किडनीमध्ये जमा झालेली अतिरिक्त खनिजे बाहेर पडतात. लिंबू पाण्यात मिसळून प्यायल्यास किडनी स्टोनमध्ये आणखीनच फायदा होतो.

कॅल्शियम युक्त पदार्थ-

तुमच्या आहारात कॅल्शियम युक्त पदार्थ असतील तर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या कधीच होणार नाही. दूध, दही, पनीर, सोयाबीन, बदाम आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने तुमच्या लघवीमध्ये कॅल्शियम जमा होण्याची शक्यता कमी होते, त्यामुळे स्टोनचा धोका नसतो.

युरिक ऍसिड-

आपल्या आहारात चिकन, अंडी, लाल मांस,आणि सीफूडचा जास्त वापर करू नका. या पदार्थांच्या अतिसेवनाने शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते आणि किडनी स्टोन होण्याचा धोका सुद्धा वाढतो. त्यामुळे किडनी स्टोन टाळण्यासाठी मांसाहाराऐवजी सकस आहार घ्या.