जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ मोठा आजार; शरीराला पोहचेल हानी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या आहारात दररोज हमखास वापरला जाणारा पदार्थ कोणता असेल तर तो मीठ हा होय. पदार्थांना चव आणण्यासाठी स्वयंपाकघरात महत्त्वाची भूमिका ही मीठ बजावते. जेवणात मीठ नसेल तर पदार्थ हा अळणी लागतो आणि जास्त झाल्यास खारट. त्यासाठी मीठाचे योग्य प्रमाण असणे देखील गरजेचे आहे. मात्र, मिठाच्या अतिसेवनाने आपल्याला हार्टअटॅक सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते हे विसरून चालणार नाही. जास्त मीठ खाण्याची सवय सोडायची असेल तर कोणते उपाय करावेत आणि जास्त मीठ खाण्याचे कोणते धोके होतात. हे आपण जाणून घेणार आहोत.

आहारातील महत्वाचा घटक मानला जात असलेल्या मिठापासून अनेक आजार उध्दभवतात. सर्वत्र आंबट पदार्थांना अधिक चव आणण्यासाठी मिठाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, आज याच मिठामुळे अनेक लोक उच्च रक्तदाब या आजाराने ग्रस्त आहेत आणित्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

अनेक संशोधनात आढळून आले आहे की, आपल्या दररोजच्या अन्नामध्ये जास्त मीठ वापरल्यास आणि ते खाल्ल्यास रक्तवाहिन्या अरुंद होतात. परिणामी त्याचा रक्तप्रवाहावर परिणाम होतो. ही परिस्थिती मीठ खाल्ल्याच्या अर्ध्या तासानंतरच सुरू होते.

salt

आहारात मिठाचे किती प्रमाण असावे?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची शक्यता वाढते. त्यामुळे दिवसभरात फक्त 2 ग्रॅम मीठ शरीरात जाईल, असा प्रयत्न करावा. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, प्रत्येक प्रकारच्या अन्नामध्ये साधारणपणे 3.8 ग्रॅम असते, जे खाल्ल्यानंतर रक्तवाहिन्या उघडण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी दिवसाला 1.5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणे हानिकारक असू शकते.

heart attack

‘हे’ आहेत धोके

1) ब्लड प्रेशर जास्त होऊ शकते.
2) शरीरात डिहाइड्रेशनचे प्रमाण वाढते. हार्ट आणि नसांवर याचा गंभीर परिणाम होतो.
3) हार्ट अटॅक आणि रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते.
4) हीमोफिलियाच्या रूग्णांमध्ये रक्त खुप पातळ होते.
5) आतड्यांचा कॅन्सर होऊ शकतो.
6) किडनी रोग, किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.
7) डोकेदुखी आणि शरीरात सूज येऊ शकते.
8) लठ्ठपणाचा मोठा धोका असू शकतो.

Salt

‘असे’ मिळतात मिठाचं प्रमाण वाढल्याचे संकेत

– पोट फुगणे
– पोटात सूज
– हाय ब्लड प्रेशर
– पुन्हा पुन्हा तहान लागणे
– वारंवार लघवी लागणे
– झोपेची समस्या
– अशक्तपणा