हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ECHS Recruitment 2025 – ज्यांना ECHS (माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना) मध्ये काम करायचे असेल , त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. ECHS पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, प्रभारी अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, दंत सहाय्यक तंत्रज्ञ/स्वच्छताशास्त्रज्ञ, ड्रायव्हर, आयटी तंत्रज्ञ, लिपिक/डेटा एन्ट्री ऑपरेटर, चौकीदार, शिपाई, ड्रायव्हर, महिला परिचर, सफाईवाला” या सर्व पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीतून एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार असून , पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत , हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. यासोबतच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे आयोजन 21 फेब्रुवारी 2025 करण्यात आलेले आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पदाचे नाव (ECHS Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, प्रभारी अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, दंत सहाय्यक तंत्रज्ञ/स्वच्छताशास्त्रज्ञ, ड्रायव्हर, आयटी तंत्रज्ञ, लिपिक/डेटा एन्ट्री ऑपरेटर, चौकीदार, शिपाई, ड्रायव्हर, महिला परिचर, सफाईवाला या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
एकूण 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वेतनश्रेणी (ECHS Recruitment 2025)–
पदानुसार वेतन दिले जाईल .
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख –12 फेब्रुवारी 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एसओ ईसीएचएस, एसटीएन मुख्यालय खडकी
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – ECHS सेल, C/O स्टेशन मुख्यालय खडकी, दारूगोळा कारखान्याजवळ, खडकी, पुणे महाराष्ट्र पिन-411003
मुलाखतीची तारीख – 21 फेब्रुवारी 2025
महत्वाची लिंक्स –
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा. https://www.echs.gov.in/
हे पण वाचा : बॉम्बे हायकोर्टात 129 क्लर्क पदांची भरती; शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख पहा




