सणासुदीच्या मुहूर्ताला यंदा ‘मंदी’चे विघ्न; वस्तू ,प्रॉपर्टी खरेदीबाबत ग्राहकांचा निरुत्साह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी। अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे मानक मानल्या जाणाऱ्या आणि खरेदीदारांच्या निर्णय यादीत महत्त्वाचे स्थान पटकावणाऱ्या वाहन, घर आणि सोने खरेदीवरील मंदीचे सावट दसऱ्यातही कायम होते. खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा सण महत्त्वपूर्ण म्हणून ओळखला जातो. पण या मुहूर्ताच्या दिवशी अनेकांनी आपल्या खरेदी यादीला मंदीमुळे आखडते घेतल्याचे स्पष्ट झाले.

सर्व मौल्यवान घटकांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहूनही मंगळवारच्या दसऱ्याच्या खरेदीचा उत्साह बाजारात मावळल्याचे चित्र होते. ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर ४० हजार रुपये प्रति तोळा होता, तर ऑक्टोबरमध्ये त्यात २,००० रुपयांनी घट झाल्यानंतर ऐन दसऱ्याच्या मुहूर्ताला दर ३८ हजार रुपये प्रति तोळा राहिला. सोन्याच्या किमती कमी होऊनही ग्राहकांचा सोने खरेदी करण्याचा उत्साह काहीसा कमी झाल्याचे चित्र शहरातील सराफ बाजारात दिसत होते. सातत्याने सोन्याच्या दरात होणारी वाढ आणि मंदीसदृश परिस्थिती याचा फटका सोने खरेदीलासुद्धा बसला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदीत ५० टक्क्यांनी घट झाल्याचे झवेरी बाजार येथील एका दागिने विक्रेत्याने सांगितले. दसऱ्याला अनेक ग्राहक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी करतात. या वर्षी वाहन खरेदीत ४० टक्क्यांनी घट झाल्याचे मारुती, फोक्सव्हॅगन कंपनीच्या वाहन विक्री दालनातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

इतर काही बातम्या –

 

 

 

Leave a Comment