अरे बापरे! हिऱ्या-सोन्याची नव्हे तर मानवी केसांची होतीये तस्करी; चीनशी थेट कनेक्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजवर आपण माणसांची सोने किंवा चांदीची तसेच हिऱ्यांची तस्करी होत असल्याचे ऐकत आलो आहोत. मात्र आता चक्क केसांची तस्करी झाल्याचे उघडकीस आली आहे. चीनमध्ये टक्कल पडण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत चीनलाच केसांची तस्करी केली जात आहे. नुकतेच ईडीने 11 हजार 793 कोटी रुपयांच्या मानवी केसांच्या तस्करीचे रॅकेट (Human Hair Trafficking) पकडले आहे. यातूनच ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

मानवी केसांची होतीये तस्करी…

ईडीने नुकतेच तब्बल 11 हजार 793 कोटी रुपयांच्या मानवी केसांच्या तस्करीचे रॅकेट पकडले आहे. यातूनच फक्त मानवाची किंवा मौल्यवान धातूंची तस्करी होत नाही तर केसांची देखील तस्करी करण्यात येते ही बाब समोर आली आहे. या केसांची तस्करी केल्यानंतर त्याचा सर्व पैसा म्यानमार मधील व्यापाऱ्यांकडून हैदराबादला पाठवला जात होता. हा पैसा वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर देखील करण्यात येत होता. या खात्यांवरची एकूण रक्कम सुमारे 2,491 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहेत. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी ईडीने 2022 मध्येच शोध मोहीम सुरू केली होती. अखेर म्यानमारमध्ये हे रॅकेट पकडण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीने मोडस ऑपरेंडी उघड केल्यानंतर ही कारवाई केली आहे. यापूर्वी 2021 मध्येच नायला फॅमिली एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध बेनामी आयात निर्यात कोड, फसवणूक खोटेपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व प्रकरणाचा खोल तपास केल्यानंतर हैदराबाद विमानतळावरून चीनमध्ये आणि म्यानमार, बांगलादेश, व्हिएतनाम अशा ठिकाणी केसांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. आता पोलीस या प्रकरणाचा आणखीन खोलवर तपास करीत आहेत.

दरम्यान, ईडीने ज्या कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे ती कंपनी कमी दरांमध्ये केसांची निर्यात अनेक वेगवेगळ्या बेनामी संस्थांना करत असल्याचे देखील समोर आले आहे. तपासात हे देखील आढळले आहे की, जेव्हा या संस्था एखाद्या मोठ्या कारवाईमुळे अडचणी येतात तेव्हा त्या बरखास्त केल्या जातात आणि नवीन IEC तयार करण्यात येतात.