हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात रडारवर असलेल्या शिवसेनेने प्रताप सरनाईक यांच्यावर सक्तवसुली संचालनालय ED आणि केंद्रीय अन्वेषण विभागानं CBI या प्रकरणात लोणावळा येथे एका रिसॉर्टवर एकत्रित रित्या धाड टाकली अशी माहिती आता समोर येते आहे. काही वेळापूर्वीच आणि सीबीआयचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले असून या ठिकाणी सध्या शोध सत्र सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयने प्रताप सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी ही धाड टाकल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. याबाबत थोड्याच वेळात अधिकृत माहिती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक व त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. परंतु नंतर हा तपास काहीसा थंडावला होता मात्र आता प्रताप सरनाईक यांच्या रिसॉर्टवर धाडी टाकल्या मुळे या प्रकरणात नवी माहिती पुढे येईल काय याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात.
Pratap Sarnaik GAYAB!!??
प्रताप सरनाईक कुठे आहात!!?? @BJP4Maharashtra— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 18, 2021
काय आहे प्रकरण?
टॉप्स ग्रुप करून MMRDAला 175 कोटींच्या कंत्राटासाठी सात कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केकेली होती. राहुल नंदा यांच्या टॉप सिक्युरिटी कडून शंभर पैकी फक्त 70 टक्के गार्डस वापरले जायचे. 30 टक्के गार्डचा वापर केला जात नव्हता. म्हणजे जवळपास 150 च्या आसपास गार्डस वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉपस च्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याची माहिती तपासातून उघड झाली होती. यापैकी काही वाटा प्रताप सरनाईक यांना मिळत असल्याचा संशय ED ला आहे.