बिहार- झारखंड मध्ये ED- CBI ची छापेमारी; आरजेडी नेते टार्गेटवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बिहार मध्ये सत्ताबदल होताच सीबीआय आणि ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. जमीन देवाण-घेवाण प्रकरणी आरजेडी आमदार सुनील सिंग, माजी आमदार सुबोध रॉय, राज्यसभा खासदार अशफाक करीम आणि फयाज अहमद यांच्यावर छापेमारी करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बिहारमाधे नव्याने स्थापन झालेल्या नितीशकुमार यांच्या सरकारला आजच बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यापुर्वीच ईडी आणि सीबीआय ऍक्टिव्ह झाली आहे. सीबीआय ने छापेमारी केलेले सुनील सिंह और सुबोध राय आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे अंत्यंत जवळचे मानले जातात. गेल्या महिन्यात लालू यादव यांचे माजी ओएसडी भोला यादव यांना या प्रकरणी सीबीआयने अटक केली होती.

या कारवाईनंतर आमदार सुनील सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आमच्यावर जाणूनबुजून कारवाई केली जात असून याला काहीही अर्थ नाही. केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवली की आमदार आपल्या सोबत येतील हा भाजपचा विचार आहे असा थेट आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे RJD खासदार मनोज झा यांनीही या कारवाईवरून भाजपवर टीका करत म्हंटल की, भाजपावाले राजकीय लढाई लढू शकत नाहीत, ही रेड ईडी सीबीआयची नसून भाजपची रेड आहे कारण या संस्था भाजपसाठी काम करतात असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, सीबीआयच्या छाप्यांनंतर ईडीही सक्रिय झाली आहे. बेकायदेशीर खाणकामात मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने झारखंड, तामिळनाडू, बिहार आणि दिल्लीतील 17-20 ठिकाणी छापे टाकले आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा आणि बच्चू यादव यांची चौकशी केल्यानंतर ईडीने छापे टाकले. या दोघांना काही काळापूर्वी ईडीने अटक केली होती. ईडीने मार्चमध्ये मिश्रा आणि इतरांविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून छापे टाकण्यास सुरुवात केली.