मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने बजावली आहे. ईडीने रोहित पवार यांना बुधवारी म्हणजेच 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. या अगोदर केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या कारणांसाठी नोटीस बनवण्यात आली होती. तसेच बारामती ॲग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर आता थेट रोहित पवार यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.

मुख्य म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांच्या घरी ईडीने छापेमारी केली होती. परंतु तेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. या छापेमारीनंतर माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केंद्र सरकारवर लावला होता. त्यानंतर आता थेट ईडीने नोटीस बजावल्यामुळे रोहित पवार यांना याचा चांगलाच धक्का बसला आहे.

मध्यंतरी, बारामती ॲग्रो संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने रोहित पवार यांना मोठा दिलासा दिला होता. न्यायालयाच्या आदेशावरून, रोहित पवारांच्या कंपनी विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेले आदेश मागे घेतले आहेत. मंडळाने ॲग्रो कंपनीवर कारवाई करत दोन प्लांट रद्द करण्यास सांगितले होते. त्यानंतरच रोहित पवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.