ED Recruitment 2024 | ED मध्ये ऑफिसर बनण्याची मोठी संधी, महिना मिळेल दीड लाखापेक्षा जास्त पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ED Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता अंमलबजावणी संचालनालयात म्हणजेच ईडीमध्ये ज्यांना नोकरी करायची आहे, त्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे. ती म्हणजे उपसंचालक आणि ड्रायव्हर या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केलेल्या आहेत आणि याबाबत त्यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर देखील माहिती दिलेली आहे. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

ईडीच्या (ED Recruitment 2024) या भरतीतून अनेक पदे भरली जाणार आहेत. या भरतीची अर्ज करण्याची 16 एप्रिल 2024 शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्हाला जर इडीमध्ये अधिकारी व्हायचे असेल तर तुम्ही या 16 एप्रिल आधीच अर्ज करा आणि खाली दिलेली सर्व माहिती नीट काळजीपूर्वक वाचा.

पात्रता आणि वयोमर्यादा

ईडीमधील या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडे पात्रता असणे गरजेचे आहे. याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी त्यांच्या अधिसूचनेमध्ये जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे वयाचा तपशील देखील तुम्ही अधिसूचनेमध्ये पाहू शकता.

मासिक वेतन | ED Recruitment 2024

या ईडी भरती अंतर्गत जर तुमची भरती झाली तर या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वेतन दिले जाणार आहे. त्या त्या पदाच्या पात्रतेनुसार तुम्हाला वेतन मिळणार आहे. यासाठी तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन वाचू शकता.

कशाप्रकारे निवड होईल

या ईडीच्या भरतीच्या अधिसूचना आणि अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये चाचणी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे या ईडीची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवाराची दिल्लीत नियुक्ती केली जाईल. निवड झाल्यावर उमेदवारांना एपीजे अब्दुल कलाम रोड नवी दिल्ली, 110011 दिल्ली येथे काम करावे लागेल.

अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा