Edible Oil Price : गृहीणींसाठी दिलासा! खाद्यतेलांच्या किंमती झाल्या कमी; केंद्र सरकारची मोठी माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Edible Oil Price । कोरोना काळापासून खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता देखील होरपळून निघाली होती. मात्र गेल्या काही काळापासून खाद्यतेलाच्या किमती जागतिक पातळीवर घटल्या आहेत. याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, रिफाइंड सूर्यफूल तेल २९ टक्क्यांनी, रिफाइंड सोयाबीन तेल १९ टक्क्यांनी आणि पामोलिन तेल २५ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. खाद्यतेलाच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

खाद्यतेल कमी होण्याचे कारण काय? (Edible Oil Price)

जागतिक पातळीवर खाद्यतेलांमध्ये होत असलेली घसरण आणि सतत किमतीत होणाऱ्या बदलांमुळे खाद्यतेलांचे दर देखील खाली घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या या घसरणीचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. केंद्राने सांगितले आहे की, सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्न करत आहे. तसेच, देशांतर्गत किमती निश्चित करण्यासाठी सरकार उद्योग नेते आणि संस्थांशी चर्चा करत आहे. विशेष म्हणजे, 2022 मध्ये देशांतर्गत किमती कमी करण्यासाठी सरकारने आयात शुल्क कमी केले आहे.

दरम्यान खाद्यतेलांच्या किमतींमध्ये (Edible Oil Price) घसरण झाल्यामुळे याचा सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. क्रूड सनफ्लॉवर ऑईल, क्रूड सोयाबीन ऑईल आणि क्रूड पामोलिन ऑईल किंमती जागतिक पातळीवर घसरल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून या किमतीत बरीच घट झाली आहे. आता पुन्हा खाद्यतेलांच्या किमती कमी झालेल्या पाहिला मिळत आहेत. त्यामुळे जोपर्यंत जागतिक पातळीवरील किंमती स्थिरावत नाही तोपर्यंत खाद्य तेलाच्या किमती कमीच राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, एकीकडे सरकारकडून खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यात आल्या तरी दुसरीकडे काही प्रमुख खाद्यतेलांमध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्यांही पसरल्या होत्या. काही व्यापारी खाद्यतेलामध्ये भेसळ करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे खाद्यतेल खरेदी करत असताना व्यवस्थित बघून घ्या आणि खात्री करुन घ्या.