संसदेतील घुसखोरी प्रकरणाचा नागपूर अधिवेशनावर परिणाम; गॅलरी पासेस देण्यास केली बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज संसदेचे कामकाज सुरू असताना मध्येच दोन अज्ञात व्यक्ती घुसल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारानंतर लोकसभेच कामकाज तातडीने थांबवण्यात आलं. तसेच आतमध्ये शिरलेल्या अज्ञात व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूर अधिवेशनात गॅलरी पासेस देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इथून पुढे कोणत्याही व्यक्तीला गॅलरी पासेस देण्यात येणार नाहीत.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये लोकसभा गॅलरीतून दोन अज्ञात व्यक्तींनी सभागृहात येऊन गोंधळ घातल्यानंतर दोन्ही सभागृहातील गॅलरी पासेसना बंदी केली आहे. तसेच, इथून पुढे आमदारांना दोन पासेस दिले जातील तीन पास दिले जाणार नाही अशी माहिती विधान परिषद उपासभापती निलम गोऱ्हे यांनी सभागृहात दिली आहे. आज घडलेल्या घटनेनंतर सुरक्षितेचे खबरदारी म्हणून हे ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.

आज काय घडलं?

आज सभागृहामध्ये कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून टिअर गॅस कॅन घेऊन आतमध्ये उड्या मारल्या. यामुळे सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. हे दोन्ही व्यक्ती म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावावर लोकसभा व्हिजीटर पास घेऊन आले होते. त्यांनी आत शिरताच घोषणाबाजी करत धुराच्या कांड्या सोडल्या. यामुळे सुरक्षा यंत्रणेचा देखील गोंधळ उडाला. या सर्व प्रकारानंतर संसदेचे कामकाज थांबवण्यात आले तसेच पोलिसांनी येऊन या दोन्ही अज्ञात व्यक्तींना ताब्यात घेतले.