Satara Tourism : सातारा जिल्ह्यात सहलीने येताय? तर एका दिवसात द्या या TOP 8 पर्यटन स्थळांना नक्कीच भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जानेवारी महिना म्हंटल की गुलाबी थंडीचा महिना होय. या महिन्यात गुलाबी थंडीत अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या सहली या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी निघतात. मग भल्या पहाटे एसटीतून विद्यार्थी अनेक निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देतात. त्या याठिकाणाची माहिती जाणून घेतात. तुम्हीही जर सातारा जिल्ह्यात सहलीने भेटी देऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी सातारा जिल्ह्यातील अशी काही ठिकाणी आहेत कि त्या ठिकानीही निसर्गरम्यतेचा आनंद लुटू शकता. सध्या जिल्ह्यातील अनेक ठिकाणे हे पर्यटकांनीव विद्यार्थ्यांनी गजबजून गेली आहेत. पाहुया ती कोणती आहेत ठिकाणे….

सातारा जिल्हा हा निसर्गरम्यतेने नटलेला आहे. या याठिकाणी अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत कि त्या ठिकाणी तुम्ही एका दिवसात भेटी देऊ शकतात. आणि राहूही शकता. साताऱ्यातील अशी 8 ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी तुम्ही भेटी दिल्यानंतर तुम्हाला निसर्गासह तेथील महत्वही जाणून घेता येईल.

Mahabaleshwar

1) महाबळेश्वर (Mahabaleshwar)

सातारा जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन ठिकाण म्हणजे महाबळेश्वर होय. महाबळेश्वरात सध्या दाट धुक्यात बुडालेली वाट, सभोवताली हिरवाईचा शालू पांघरलेली दाट वनराई, त्यातून वाहणारा थंडगार अवखळ वारा, कानात निनादणारी पक्ष्यांची सुरेल गाणी अशा स्वगीर्य वातावरणाचा अनुभव पर्यटक, विद्यार्थी घेत आहेत. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. काय पाहता येईल पश्चिम घाटात वसलेले हे ठिकाण जगातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. या ठिकाणी तुम्हाला वेण्णा लेकवरील नौका विहाराचा आनंद लुटता येईल.

Venna Lake Mahabaleshwar

महाबळेश्वर भोवतालची ‘इतर’ प्रसिद्ध ठिकाणे

महाबळेश्वरात अनेक प्रसिद्ध अशी पर्यटनस्थळे आहेत कि ज्या ठिकाणी फिरता येते. येथे वेण्णा लेक, केट्स पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट, किल्ले प्रतापगड, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, लॉडवीक पॉईंट, सनसेट पॉईंट, पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेला लिंगमळा धबधबा आहे. महाबळेश्वरमध्ये मुख्य आकर्षणाचे ठिकाण म्हणजे प्रसिद्ध वेण्णा लेक होय. या ठिकाणी नौकाविहाराचा आनंद तुम्ही घेऊ शकता. तापोळा (बोट क्लब) महाबळेश्वर पासून ३० कि.मी.अंतरावर सहलीसाठी आणि बोटिंग करण्यासाठी सुंदर तापोळा तलाव आहे. हा तलाव कोयना धरणातील शिवसागर या विशाल जलाशयाचाच शेवटचा भाग आहे.

Bhambvali Vajrai Waterfall

2) भांबवली वझराई धबधबा (Bhambvali Vajrai Waterfall)

भांबवली वझराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याची उंची 1840 फूट (560 मीटर) आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि याला तीन पायऱ्या आहेत. उरमोडी नदी ही या धबधब्याचा उगम स्थान आहे. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला आहे.

Pachgani Hill Station

3) पाचगणी (Pachgani)

पाचगणी हे महाबळेश्वर पासून जवळ (18 कि.मी.) अंतरावर असलेले आणखी एक थंड हवेचं ठिकाण आहे. पाचगणीच्या मुख्य बाजारापासून अवघ्या काही अंतरावर महाबळेश्वरच्या पाचगणीच्या खोऱ्यात एक पूर्ण विकसित झालेला मनोरंजन पार्क आहे. इथे सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी सवारी, घरातील खेळ, झपाटलेली घरे, शुद्ध शाहाकारी रेस्टॉरंट्स आहेत.

4) ठोसेघर धबधबा (Toseghar Waterfall)

सातारा शहरापासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा पर्यटकांना त्याच्याकडे खुणावतोय. ठोसेघर धबधबा महाराष्ट्रातील प्रमुख व परिचीत म्हणून गनला जातो. ठोसेघर धबधबा सातारा जिल्ह्यात असून सातारा शहरा पासून २४ किमी अंतरावर असलेल्या ठोसेघर गावानजिक उगम पावणाऱ्या तारळी नदीवर आहे. या ठिकाणी 2 धबधबे असून एक लहान धबधबा 110 मीटर उंचीवरून कोसळतो तर दुसरा साधारण 350 मीटर उंचावरून कोसळतो.

Wai

5) वाई (Wai)

सातारा जिल्ह्यातील वाई तालुकाही पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर दक्षिण काशी म्हणून वाई हे विख्यात धार्मिक क्षेत्र आहे. कृष्णा नदीवर अनेक घाट व प्राचीन मंदिरे आहेत. ढोल्या गणपती मंदिरामुळे वाईची प्रसिध्दी वाढली आहे. गणपती आळीच्या घाटावर कृष्णा तीरी हे वाईतील सर्वात मोठे व भव्य मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले. गाभाऱ्यात गणपतीची पाषाणाची 6 फूट उंच व लांबी 7 फूट अशी बैठी मूर्ती आहे. मंदिराच्या भव्य सभागृहाच्या तिन्ही बाजूंनी कमानी आहेत. गणपती मंदिराजवळ काशिविश्वेश्वर शंकराचे मंदिर आहे.

Kalubai Temple, Mandhardev

6) काळूबाई मंदिर, मांढरदेव (Kalubai Temple, Mandhardev)

महाराष्ट्रामध्ये प्रसिध्द असलेले व लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले काळुबाई देवीचे स्थान हे वाई तालुक्यातील मांढरदेवी डोंगरावर आहे. डोंगराच्या पठारावर मांढरदेव हे गांव आहे. या पठराची समुद्र सपाटीपासून उंची 4517 फूट आहे. काळूबाईचे मंदिर किमान 350 वर्षांपूर्वीचे आहे. तसेच वाईपासून सुमारे 10 कि.मी. अंतरावर असलेले धोम धरण प्रसिद्ध आहे. भुईज हे गाव सातारा-पुणे रस्त्यावर वसले आहे. भृंग ऋषींची समाधी येथे आहे.

Bhambvali Vajrai Waterfall

7) मेणवली घाट (Menwali Ghat)

वाई तालुक्यातील कृष्णा नदी काठी असलेले मेणवली गावात पेशवाईतील एक मुत्सद्दी व राजकारणी नाना फडणवीस यांचा गढीचा वाडा आहे. कृष्णा नदीच्या काठावरील केदार घाट व मंदिर प्रेक्षणिय आहेत. घटावरील एका छोट्या मंदिरात भली मोठी धातूची घंटा अडकविली आहे. नदी काठावरील घाट चंद्रकोरी आकाराचा असून मेणवलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. पांडव गड वाई शहरापासून 6 किमीवर वायव्य दिशेला हा गड आहे.

Ajinkyatara Fort

8) अजिंक्यतारा किल्ला (Ajinkyatara Fort)

अजिंक्यतारा हे सातारा जिल्ह्यातील एक शहर आहे. ज्याला स्वराज्याची चौथी राजधानी म्हणूनही ओळखले जाते. अजिंक्यतारा किल्ल्याची उंची 1 हजार 356 मीटर (4400 फूट) आहे आणि हा मध्यम आकाराचा किल्ला आहे. अजिंक्यतारा किल्ला सातारचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सात पाण्याचे तलाव देखील आहेत. हे तलाव पावसाळ्यात भरतात. येथे दगडांवर अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत. त्याच्या जवळच अजिंक्यतारा नावाचा मोठा पट्टाही उभारण्यात आला आहे. येथून तुम्ही चंदन वंदन किल्ला आणि जरंडेश्वर टेकडी सहज पाहू शकता. छत्रपती शाहू महाराजांनी १७२१ मध्ये या किल्ल्याच्या कुशीत एक टाउनशिप स्थापन केली आणि प्रथमच आपली राजधानी किल्ल्यावरून जमिनीवर हलवली.

कसे जाल ‘या’ ठिकाणी

या ठिकाणांना भेट देण्यासाठी विमान, ट्रेन आणि बस किंवा खासगी वाहनांनी जाता येते. रत्नागिरी 239 किमी (5 तास 2 मिनिटे), मुंबई 244 किमी (4 तास 26 मिनिटे) पुणे 102 किमी (2 तास 18 मिनिटे), कोल्हापूर 169 किमी ( 2 तास मिनिटे), सातारा 58.2 किमी (1 तास 32 मिनिटे), औरंगाबाद 337 किमी (6 तास 52 मिनिटे), नाशिक 318 किमी (6 तास 23 मिनिटे) इतके अंतर व वेळ सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला भेट देण्यासाठी आहे.