लाल मुळ्याच्या शेतीतून 8 वी पास शेतकरी झाला मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती करताना कमी वेळेत जास्त उत्पादन कसे मिळेल. अशी पिके शेतीत घेत आहेत. कमी गुंतवणूक करून शेतीतून भरघोस उत्पादन घेत आपली आर्थिक सुधारणा करत आहेत. शेती करण्यासाठी जास्त शिक्षण असावे लागत नाही त्यासाठी डोक्यात असावी लागते फक्त कल्पना हे मथनिया, जोधपूर येथील आठवी पास शेतकरी मदनलाल यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी मुळ्याची लागवड करत लाल मुळ्यातून चांगले उत्पन्न मिळवले आहे.

आपण जेवणामध्ये प्रामुख्याने पांढरा मुळा हा खाण्यासाठी वापरतो. मात्र, लाल मुळा हा फ्रच कमी लोकांनी पाहिला असेल. या लाल मुळ्याची लागवड अनेकांना आश्चर्यचकित करू शकते. अशा या लाल मुळ्याची शेती एका कमी शिकलेल्या शेतकऱ्याने करून दाखवली आहे.

शेती व्यवसयातून केवळ मुख्य पिकातूनच उत्पन्न मिळते असे नाही. काळाच्या ओघात पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. शेतकरी हे देखील नगदी पिकावरच भर देत आहे. भाजी पाल्याच्या लागवडीतून कमी काळात अधिकचे उत्पन्न हे सहज शक्य आहे. शेतकरी मित्रानो, तुम्हालाही कोणत्या फळाची किंवा रोपांची लागवड करायची असेल आणि रोपे खरेदी करायची असतील तर चिंता करू नका.

हॅलो कृषी हे मोबाईल अँप डाउनलोड करा आणि तुमच्या आसपास असलेल्या रोपवाटिका मालकांशी थेट आणि अगदी कमी वेळेत संपर्क साधा. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड आणि Install करा. Hello Krushi ओपन करताच तुम्हाला त्यामध्ये रोपवाटिका, खत दुकाने आणि कृषी केंद्र हा पर्याय दिसेल. यावर क्लीक करताच तुम्हाला तुमच्या आसपास असलेल्या खत दुकानदार आणि रोपवाटिकांची यादी आणि त्यांचे मोबाईल क्रमांक दिसतील. महत्वाचे म्हणजे तुम्ही पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकू सुद्धा शकता. यासोबत आपल्याला शेतीतील इतर व्यवसायासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या योजनांची माहिती आदी गोष्टीही Hello Krushi अँपवर पाहता येतात.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click here…

लाल मुळ्यामुळे शेतकरी मदनलाल यांचा गौरव

मदनलाल शेतीत नवनवीन शोध घेत असतात. लाल मुळा करण्यापूर्वी त्यांनी दुर्गा ही लाल गाजराची प्रगत जाती विकसित केली आहे. त्याचे बियाणे ते देशभर पुरवतात. याशिवाय गव्हातही नावीन्य आले आहे. 2017 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि 2018 मध्ये केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनीही त्यांचा या कार्यासाठी गौरव केला आहे.

Red Mula

लाल मुळ्याची चव कशी असते?

लाल मुळा हा पांढऱ्या मूल्याप्रमाणेच असतो. या मुळ्याची चव देखील पांढऱ्या मुळासारखीच असते. त्याचबरोबर यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आढळतात. जिथे बाजारात सामान्य मुळा 10 ते 20 रुपये किलोने मिळतो, तिथे लाल मुळा 100 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.

लाल मुळा लागवडीसाठी योग्य वेळ

लाल मुळा हे फक्त थंड हवामानातील पीक आहे, ज्याच्या लागवडीसाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी हा महिना अतिशय योग्य मानला जातो. लागवडीसाठी निचरा होणारी जमिन उत्तम मानली जाते. जमिनीचा सामू ५ ते ७.५ च्या दरम्यान असावा लागतो. याशिवाय वालुकामय जमिनीतही लागवड करता येते. लाल मुळ्याची लागवड बियांची पेरणी करुन किंवा नर्सरीत रोपे वाढवूनही करता येते. पेरणीसाठी सुमारे ८ ते १० किलो बियाणे लागते. व्यावसायिक लागवडीसाठी रोपवाटिक वाढवलेल्या सुधारित वाणांची निवड करावी. पेरणीनंतर साधारण २० ते ४० दिवस लागतात. एकरी ५४ क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळू शकते.

Red Radish

कमी खर्चात अधिक नफा मिळवा

लाल मुळ्याची शेती केल्यास तसेच या अपिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यातून चांगला नफा मिळवता येतो. कमी शेतकऱ्यांकडून त्याची लागवड होत असल्यामुळे लाल मुळा अजूनही बाजारात क्वचितच मिळतो. शेतकऱ्यांनी लागवड केल्यास त्यांना सामान्य मुळ्यापेक्षा अधिक नफा मिळू शकतो.

Red Radish

लाल मुळा लागवडीसाठी माती,हवामान (Red Radish Cultivation)

लाल मातीच्या लागवडीसाठी जीवाश्म माती सर्वात योग्य आहे. चांगले निचरा होणारी वालुकामय चिकणमाती मातीत चांगले उत्पादन करता येते. शेतकऱ्याची इच्छा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तो चिकणमाती, चिकणमाती जमिनीतही लाल मुळा पिकाची लागवड करू शकतो. लक्षात ठेवा की मातीचे pH मूल्य फक्त 6.5 ते 7.5 दरम्यान असावे.

radishes

किती मिळतो नफा?

सर्वसाधारणपणे पांढऱ्या मुळ्याला बाजारात ६० ते ७० रुपये किलोपर्यंत भाव मिळू शकतो. एक किलो लाल मुळ्याचा भाव ५०० ते ८०० रुपये किलोपर्यंत पोहोचतो. अशा परिस्थितीत कमी खर्चात अधिक नफा मिळू शकतो. काही मोठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट त्यांच्याकडून हा मुळा घेत आहेत. याशिवाय विवाह सोहळ्यात लाल मुळ्यालाही चांगली मागणी होत आहे.

Red Radish 09

लाल मुळ्याची खासियत

लाल मुळा फ्रेंच मुळा म्हणूनही ओळखला जातो जो उच्च श्रेणीची भाजी आहे. त्यात अधिक अँटिऑक्सिडेंट आणि अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत. जे पांढऱ्या मुळा पासून लाल मुळाला खास बनवते. लाल मुळ्याची चव हलकी तिखट असते. मुळे गडद लाल रंगाची असतात आणि पाने गडद हिरव्या रंगाची असतात. लाल रंगामुळे ते दिसायला सुंदर आहे. लाल मुळ्याच्या वापराने कोशिंबीर पौष्टिक असण्यासोबतच दिसायलाही चांगली होते.

Red Radish

अशा प्रकारे सुचली कल्पना

शेतकरी मदनलाल यांनी लाल मुळ्याची शेतीकरून आपले आजीवनमान सुधारले आहे. मुळातच शेतीती अनेक प्रकारची पिके घेऊन त्यावर प्रयोग करण्याची आवड त्यांना फार आहे. तसेच कृषी विद्यापीठाच्या उपक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. कृषी शास्त्रज्ञांचीही ते अनेकवेळा भेत घेतात. याशिवाय एकदा पांढरा मुळा हातात घेतल्यानंतर लाल रंगाचाही मुळा असूशकतो का? आपण लाल रंगाचा मुळा लागवड करून बघूया अशी कल्पना त्यांना सूचली. त्यांनी याबाबत खूप माहिती घेतली आणि त्यातून त्यांनी लाल मुळ्याची लागवड केली.

लाल मुळ्याची रोपे

लाल मुळ्याची रोपे अशा प्रकारे केली तयार

लाल मुळ्याच्या लागवडीसाठी त्यांनी बरीच पुस्तके वाचली आणि कृषी संशोधकांना भेटल्या नंतर, दोन कलमे मिसळून एक रोप तयार केले. त्याचे बी क्रॉनिक पद्धतीने तयार केले. सतत थंडीच्या दिवसात चार वर्षे पेरणी केली. त्यात दरवर्षी सुधारणा होत गेली. यावेळी त्यांच्या शेतातील एका भागात लाल मुळ्याचे योग्य उत्पादन झाले.

Red Radish 0

अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध

लाला मुळ्याची लागवड केल्यानंतर त्यावर अजून काम करण्याचा निर्णय मदनलाल यांनी घेतला आहे. या मुळ्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्याचे बियाणेही तयार केले जात आहे. जेणेकरून त्याचे उत्पादन वाढवता येईल. बाजारात सामान्य मुळा 10 ते 20 रुपये किलोने मिळत असताना, लाल मुळा 100 रुपये किलोने विकला जात आहे.