‘…म्हणून भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा सुनावणी’, एकनाथ खडसेंची भाजपवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशीचे आदेश काढण्यात आले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?
भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाथाभाऊंना (eknath khadse) अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसें यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. आतापर्यंत चार ते पाच प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न झाला पण सुदैवाने न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिल्यामुळे आज मी बाहेर आहे असेदेखील एकनाथ खडसे (eknath khadse) म्हणाले.

कृषिमंत्र्यांवर साधला निशाणा
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने पिकांची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून शेतकऱ्यांची टिंगल उडवली जात असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कृषिमंत्री अब्दुल सत्तार करत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंकडून करण्यात आला आहे. एकतर शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर करा अन्यथा शेतकऱ्यांची टिंगल तरी करू नका, असे एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना सुनावले आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय