राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 3 टक्के महागाई भत्ता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्यापासून राज्य सरकारची पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनापूर्वी आज राज्य मंत्रिमंडळाची म्हत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाची निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पयतक्र परिषदेद्वारी दिली.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजच्या महत्वपूर्ण बैठकीत आम्ही राज्य सरकारमधील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. या भत्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिला जाईल. त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपूर्वीपासून राज्य सरकारमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली जात होती. मात्र, त्याच्या मागण्यांकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही. त्यामुळे आपल्याला कधी महागाई भत्ता मिळणार? असा प्रश्न त्यांच्याकडून केला जात होता. मात्र, आता अशींदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्याने त्यांनी राज्य सरकारमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय आज घेतला आहे.