Eknath Shinde Ayodhya : शिंदे सरकारचे सर्व मंत्री ‘या’ दिवशी घेणार श्रीरामाचे दर्शन; तारीख आली समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Eknath Shinde Ayodhya : २२ जानेवारी रोजी अयोध्यात राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील ८००० हुन अधिक दिग्गजांनी या भव्य दिव्य सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र महाराष्ट्र्र सरकारमधील नेतेमंडळी निमंत्रण असूनही त्यावेळी अयोध्येला गेली नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या ५ फेब्रुवारीला हे सर्व मंत्री अयोध्यावारी करतील आणि रामलल्लाचे दर्शन घेतील.

5 फेब्रुवारीची वेळ – Eknath Shinde Ayodhya

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर भाजपने अयोध्यावारीचा टाइम टेबल तयार केला आहे. त्यासाठी ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे अशा राज्यातील मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रीमंडळाला रॅमलल्लाच्या दर्शनाची वेळ देण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाला येत्या 5 फेब्रुवारीची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व नेतेमंडळी त्यावेळी अयोध्येला (Eknath Shinde Ayodhya) जातील. खरं तर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण आले होते. मात्र ते त्या सोहळ्याला गेले नव्हते. मी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस असं आम्ही तिघेच जाण्यापेक्षा काही दिवसांनी संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिली होती.

दरम्यान, २२ तारखेळा राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर देशभरातील रामभक्त अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेत आहेत. काल संख्येने भाविक दर्शनासाठी आल्याने चेंगराचेंगरीची सारखी परिस्थिती उद्भवली होती. काही काळ दर्शन बंद सुद्धा ठेवण्यात आलं होते. या एकूण सर्व परिस्थितीनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संताप सुद्धा व्यक्त केला होता. तसेच मंदिरात परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.