Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? स्वतःच सांगून टाकलं

Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्राचे राजकारण गोल गोल फिरताना दिसत आहे. एकीकडे काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एपस्टीन फाईल्सचा दाखला देत १९ डिसेम्बरला देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होणार असं भाकीत करत खळबळ उडवून दिली आहे. तर दुसरीकडे वंचित बघून आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं विधान केलं आहे. दोन्ही विधानाचा व्यवस्थित अभ्यास केल्यास, देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असा यामागील निष्कर्ष निघतोय. याबाबत विधानसभा सभागृहात खुद्द एकनाथ शिंदेनाच तुम्ही मुख्यमंत्री होणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर शिंदेनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

नेमकं काय घडलं? Eknath Shinde

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सध्या सुरु असलेल्या राजकीय चर्चांवरून थेट एकनाथ शिंदेनाच प्रश्न केला. एकनाथ शिंदे यांचे भाषण चालू असतानाच शशिकांत शिंदे म्हणाले, १९ तारखेला काहीतरी राजकारणात मोठा धमाका होणार आहे, आणि मग परत एकदा तुम्हीच मुख्यमंत्री होणार आहात असं बोललं जात आहे, याबाबत काही खरं आहे का? यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, आमचा अजेंडा खुर्ची कधीच नाही, ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवले आहे त्यांचे प्रश्न सोडवणे हाच आमचा अजेंडा आहे. आम्ही सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु महाराष्टातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचे काम आम्ही करणार आहोत असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?

दरम्यान, २ दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक विधान करत म्हंटल होते कि, एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटत आहे. एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना भेटले, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खिशात घातलं आहे, ही त्यांची किमया आहे. त्यामुळे आता सर्व महापालिकांच्या निवडणुका शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार आहेत.