हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वेध सर्वाना लागलं आहे. मात्र एकीकडे जम्मूत काश्मीर आणि हरियाणा मधील निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अजूनही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे राज्यातील निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत थेट संकेत दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यात विधानसभेसाठी निवडणुका होतील असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हंटल आहे.
चांदीवली येथील मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसनासाठी दिलेल्या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचे संकेत दिले. येत्या दोन महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून देण्याचं आवाहन सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, चांदीवलीतील प्रकल्प बाधित झोपडपट्टी धारकांना आज 400 घरांच्या चाव्या देण्यात येत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे हे सरकार आहे. त्यामुळे विकास कामाबरोबरच कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या शासनाने गेल्या दोन वर्षात विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचे काम केले आहे. मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, महापालिका यांना दिले आहेत. पहिल्या टप्प्यात 2 लाख घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही घरे दर्जेदार व्हावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत