Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया; नेमकं काय झालं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Eknath Shinde । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत आहे. शिंदेंच्या डोळ्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या डोळ्यांना त्रास होत होता. तपासणी नंतर डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनचा (Eknath Shinde Eye Surgery) सल्ला दिला होता त्यानुसार ही शस्त्रक्रिया पार पडली. या ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी एकनाथ शिंदेंना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

कधी झाली शस्त्रक्रिया – Eknath Shinde

चष्म्याचा नंबर बदलल्याने एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) थोडं अंधुक अंधुक दिसत होते. त्यामुळे आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. ठाणे येथील माजीवाडा येथील एका प्रख्यात डॉक्टरांकडून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या ते आपल्या ठाण्याच्या घरी परतले आहेत. या शस्त्रक्रियेनंतर काही काळ विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे. त्यानुसार ते विश्रांती घेतील.

दरम्यान, काल केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारचे अभिनंदन केलं होते. आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा आणि विकसनशील भारत ते विकसित भारत अशी वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे. हा केंद्रीय अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मागील १० वर्षांच्या प्रयत्नांचे फलित असून देशाला महासत्ता बनवण्याच्या आणि देशाला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या लक्ष्याकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.