Thursday, February 2, 2023

विनायक मेटे यांच्यावर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे हे मराठा समाजाच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईला निघाले असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. डोक्याला जबर मार लगाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. “या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश  अधिकाऱ्यांना दिले असून मेटे यांच्यावर उद्या बीड येथील त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील,” अशी माहिती शिंदे यांनी दिली.

मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन मेटे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाने या अपघाताची सखोल चौकशी करावी. यातील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तपास करावा, असे आदेश पोलीस प्रशासनास दिले.

- Advertisement -

मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट करत शोकही व्यक्त केले. शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक,अध्यक्ष,माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने शिवस्मारक, मराठा आरक्षण तसेच महाराष्ट्रातील इतर विषयांकरिता आंदोलन करणारा एक बुलंद आवाज हरपला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो.भावपूर्ण श्रद्धांजली! असे ट्विटमध्ये शिंदे यांनी म्हंटले.