Eknath Shinde On Uddhav Thackeray : मोदींना तुम्ही 2 वेळा फसवलं; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Eknath Shinde On Uddhav Thackeray : 2019 साली तुम्ही लग्न एकासोबत केलं, संसार दुसऱ्यासोबत आणि हनिमून तिसऱ्यासोबत केला…. मोदींना तुम्ही 2 वेळा फसवलं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महाधिवेशनात उपस्थिताना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी अनेक खळबळजनक खुळासे करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. तसेच माझ्याकडे बोलण्यासाठी अजूनही भरपूर काही आहे, वेळ येताच बोलेन असा इशाराही शिंदेनी उद्धव ठाकरेंना दिला.

एकनाथ शिंदे म्हणाले, 2019 साली एकीकडे बाळासाहेब, दुसरीकडे मोदी यांचे फोटो लावून तुम्ही मतं मिळवलीत, आणि त्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. म्हणजेच तुम्ही लग्न एकासोबत केलं. संसार दुसऱ्यासोबत आणि हनिमून तिसऱ्यासोबत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही 2 वेळा फसवलं. महाविकास आघाडी सरकार असताना तुमच्या कुटुंबातलं काहीतरी निघाल्यावर तुम्ही दिल्लीला गेलात. दिल्लीला जाऊन पुन्हा युती करू असा शब्द देऊन आलात. मोदी साहेबांची भेट घेतला त्यावेळी तुम्हाला घाम फुटला होता,असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.

उद्धव ठाकरे दिसतात तसे इनोसंट नाहीत – Eknath Shinde On Uddhav Thackeray

तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला व मोदी साहेबांना दोन वेळा फसवलं आहे. मग तुम्ही आमच्यावर का आरोप करता ? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता केला. उद्धव ठाकरे दिसतात तसे इनोसंट नाहीत, त्यामागे अनेक चेहरे आहेत, एक चेहरे पे कई चेहरे लोग लगाते है लोग …. ते म्हणाले की, शरद पवार म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री व्हा, हे मला ते सांगत होते तेव्हा रडवेला चेहरा होता. तेव्हा जाणवले यांना मोह झाला आहे, पण मी तेव्हा एका शब्दात बोललो मंकी ठीक आहे, तुम्ही पूढे व्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी कधीच पदाला हापापलो नव्हतो असेही एकनाथ शिंदेनी म्हंटल.