ठाकरे गटाच्या नेत्याकडून एकनाथ शिंदेंना भर सभेत शिवीगाळ; पोलिसांची कठोर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकिय वर्तुळात नवा वाद निर्माण करणारी नुकतीच एक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेत उद्धव ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विक्रोळीतील राहत्या घरातून त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घटनेमुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गटात नवीन वाद निर्माण झाला आहे.

रविवारी शिवसेना उबाठा गटातर्फे ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहिर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी महापौर दत्ता दळवी यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. तसेच त्यांच्या विरोधात अपशब्द देखील वापरले. यावरूनच आक्रमकाची भूमिका घेत शिंदे गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आपल्या तक्रारीत शिंदे गटाने म्हटले आहे की, दत्ता दळवी यांनी जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. या तक्रारीच्या आधारावरच भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात भादवी कलम १५३ (अ),१५३ (ब),१५३(अ) (१)सी, २९४, ५०४,५०५ (१) (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.