निवडणूक : कराड- पाटण शिक्षक सोसायटीसाठी 21 जागांसाठी तब्बल 289 अर्ज दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत 21 जागांसाठी तब्बल 289 अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज छाननी होणार असून 1 डिसेंबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांनी दिली आहे.

कराड- पाटण तालुक्यातील शिक्षकांची सोसायटी निवडणुकीसाठी गटानिहाय अर्ज दाखल पुढीलप्रमाणे ः- तारळे- चाफळ गट -15, कोळे गट- 9, उंडाळे गट- 13, पाटण गट- 1 मधून 14 तर पाटण गट- 2 मधून 9, काले गट 9, रेठरे बु गट- 10, ओगलेवाडी गट- 12, मसूर गट- 9, मल्हारपेठ गट-8, उंब्रज गट- 14, सुपने गट-12, तळमावले गट-19, कराड गट- 13, ढेबेवाडी गट-11, महिला राखीव गटातून- 35, अनु- जाती-जमाती राखीव गट- 33, इतर मागासवर्ग राखीव गट- 18, विजाभज राखीव गट- 26 असे एकूण 289 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची निवडणूक सुरू असतानाच कराड- पाटण सोसायटीची निवडणूक लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण 20 नोव्हेंबरला थांबते न थांबते तोच कराड- पाटण तालुक्यातील शिक्षकांच्यातील राजकीय लढती सुरू होणार आहेत. या सोसायटी साठी 11 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 12 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.