शरद पवारांच्या पक्षाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!! नेमका निकाल काय??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत वापरल्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) तुतारी हेच चिन्ह कायम राहणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीमुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह वापरल्यास निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला परवानगी दिली आहे. तसेच आता शरद पवार यांच्या पक्षाला देणगी देखील स्वीकारता येणार आहे. याबाबतचे अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिली आहे. या अधिकृत मान्यतेमुळेच आता कलम 29 ब नुसार शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

दरम्यान, आज निवडणूक आयोगासमोर याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्येच देणगी स्वीकारण्याबाबत आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला परवानगी दिली आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच टॅक्स बॅनेफिट मिळत नव्हता. परंतु आता आमची ही विनंती मान्य करण्यात आली आहे.”