राज्यातील 500 डॉक्टरांना लावली जाणार इलेक्शन ड्युटी; रुग्णांचे होणार का हाल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच शिक्षकांबरोबर डॉक्टरांनाही इलेक्शन ड्युटी (Election Duty) लावली जाणार आहे. यामुळे रुग्णांच्या सेवेची पूर्ण जबाबदारी रुग्णालयात काम करणाऱ्या इतर डॉक्टरांवर (Doctor’s) येऊन पडणार आहे. तसेच, यामुळे रुग्णांची गैरसोय देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण निवडणुकीच्या काळामध्ये डॉक्टरांना देखील अतिरिक्त काम करावे लागेल. मुख्य म्हणजे, यापूर्वी कधीही निवडणुकीच्या कामाची जबाबदारी डॉक्टरांवर सोपवण्यात येत नव्हती. परंतु यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा डॉक्टर्स इलेक्शनची कामे करताना दिसणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कुपर आणि नायर डेंटल रूग्णालयातील एकूण 500 डॉक्टरांना इलेक्शनची ड्युटी लावली जाणार आहे. यात नर्सपासून ते डिनपर्यंतचा समावेश असणार आहे. या सर्वांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. परिणामी यामुळे रुग्णालयातील रुग्णांचे हाल होऊ शकतात. तसेच, कमी स्टाफ असल्यामुळे इतर डॉक्टरांवरील कामाचा भार वाढू शकतो. कारण की, मुंबईच्या महापालिका रुग्णालयातील 80 टक्के स्टाफ इलेक्शन ड्युटीवर जाईल.

खरे तर निवडणुकीच्या कामातून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वगळले असताना ही यंदा निवडणूक आयोगाने डॉक्टरांना निवडणूक ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये केईएम रूग्णालयातील 900 पैकी 600 नर्सेसना इलेक्शन ड्युटीवर बोलवण्यात आले आहे. यामुळे विचार कर्मचाऱ्यांवरील भार वाढेल असे म्हटले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला याच मुद्द्याला घेऊन राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. जर शिक्षकांना आणि डॉक्टरांना कामाला लावायचे आहे तर निवडणूक आयोगाचे काम काय? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान निवडणुका आयोगाने शिक्षकांना निवडणुकीची ड्यूटी लावल्यानंतर शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी या पालकांनी मुंबईतील शिक्षकांना आयोगाने कामाला लावले तर मुलांना शिकवणार कोण असा संवाद उपस्थित केला होता. या मुद्द्याला धरूनच राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला चांगलेच सुनावले आहे. तसेच, “शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामाला जाऊ नये” असे देखील सांगितले आहे.