मोठी बातमी!! इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांमध्ये वेगवान हालचालींना सुरुवात झाली आहे. आज इंडिया आघाडीचीही महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची इंडिया आघाडीच्‍या अध्‍यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, संयुक्‍त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या निमंत्रक पदाचा प्रस्‍ताव नाकरल्याची देखील मोठी बातमी समोर आली आहे.

इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः पंतप्रधान पदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील पाठिंबा दिला होता. आघाडीमध्ये या सर्व घडामोडी घडत असताना अखेर आज मल्लिकार्जुन खरगे यांची आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील आघाडीचे अध्यक्ष करण्यात येईल अशी चर्चा रंगली होती. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. थोडक्यात आता, आघाडीच्या कामाला देखील जोर आल्याचे स्पष्ट झाले आहे.