पाटण तालुका खरेदी -विक्री संघ निवडणूक बिनविरोध : पाटणकरांचे निर्विवाद वर्चस्व

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.

या निवडीमध्ये संस्था सभासद प्रतिनिधी पुढीलप्रमाणे ः- प्रतापराव शिवाजीराव काळे (मालदन), अविनाश रामचंद्र जानुगडे (जानुगडेवाडी), प्रमोद दादासो देसाई- देशमुख (भोसगांव), रामचंद्र यशवंत साळुंखे (रूरूले), हिंदूराव बाबुराव शिर्के (नाटोशी), हणमंत किसन माने (ठोमसे), सुरेश विठ्ठल डुबल डुबलवाडी (खळे), महेंद्र पतंगराव मगर (ढोरोशी), किसन मारूती डिगे (डिगेवाडी), शशिकांत मधुकर पाटील (तारळे), नथूराम शंकर मोरे (मोरगिरी), महिला राखीव मधून सौ. लता रामचंद्र मोरे (ढाणकल), सौ. अर्चना प्रकाश पाटणकर (निवकणे), अनुसूचीत जाती- जमाती मधून भानुदास दगडू सावंत (सावरघर), इतर मागास वर्गातील अनिल हरी डाकवे (डाकेवाडी- काळगांव), भटक्या विमुक्त जाती रामचंद्र भैरू झोरे (पाठवडे), व्यक्ती सभासद संजय तुकाराम पाटील (विहे) यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडीनंतर बोलताना विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, पाटण तालुका खरेदी- विक्री संघ आतापर्यंत चांगला चालविला असून या संघामार्फत निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत. तालुक्यातील सर्व विभागातील व सामाजिक क्षेत्रातील समतोल राखून संघाच्या संचालक मंडळात संधी दिलेले आहे. अमरसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शन व संघाचे चेअरमन अँड. अविनाश जानुगडे व त्याचे सर्व सहकारी यांनी गेली 5 वर्षे अत्यंत काटेकोरपणाने कामकाज चालवून खरेदी विक्री संघ प्रगतीपथावर आणला आहे. संघाची प्रगती व नावलौकिक लक्षात ऊन निवडणूकीचा अनाठायी खर्च टाळून संघाची निवडणूक बिनविरोध केली आहे. नव्या संचालकांनी संस्था हिताचे निर्णय एकमताने घ्यावेत. चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीनंतर कामकाजासंदर्भात प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली जाईल.

नवनिर्वाचित संचालकांचे विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, अमरसिंह पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पाटण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राजाभाऊ शेलार, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेश पवार, पाटण अर्बन बँक चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, तालुका दूध संघ चेअरमन सुभाषराव पवार, कोयना शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, दिनकरराव घाडगे, शंकर शेडगे, गुरुदेव शेडगे आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभिनंदन केले .