Monday, February 6, 2023

शोभा पवार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वर्षाताई पाटील उपाध्यक्षपदी शीलादेवी पाटणकर; निवडी बिनविरोध

- Advertisement -

कराड | तांबवे (ता. कराड) येथील (कै.) सौ. शोभा पवार कऱ्हाड-पाटण तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची आणि अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी वर्षाताई पाटील तर उपाध्यक्षपदी शीलादेवी पाटणकर यांची निवड झाली.

(कै.) सौ. शोभा पवार कऱ्हाड-पाटण तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. संस्थेच्या नूतन संचालकपदी विकास किरतकर, धर्मेंद्र राऊत, शंकर सुतार, मंगेश पवार, सुरेश निकम, विश्वासराव पाटील, जयप्रकाश भोसले, संजय मोरे, तुकाराम चव्हाण, प्रकाश कांबळे, वर्षाताई पाटील, शीलादेवी पाटणकर, विश्वनाथ कांबळे, कृष्णत फल्ले, राजश्री साळुंखे यांची निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी व्ही. आर. मोरे यांच्या उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली.

- Advertisement -

सर्वानुमते अध्यक्षपदी पाटील तर उपाध्यक्षपदी पाटणकर यांची निवड झाली. विश्वासराव पाटील यांनी पतसंस्थेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या पतसंस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. सचिव पी. एम. पवार, लिपिक पूजा फल्ले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्री. भोसले यांनी आभार मानले.