सातारा जिल्ह्यात ‘या’ बाजार समिती निवडणुकीत होणार ‘काटे कि टक्कर’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असत. आता पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यातील 9 कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यात सातारा, मेढा, कोरेगाव, वाई, लोणंद, फलटण, वडूज, कराड व पाटण या 9 बाजार समितींची निवडणूक होणार आहे. यात अनेक राजकीय नेत्यांमध्ये ‘काटे कि टक्कर’ पहायला मिळणार आहे.

सहकार निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने काल निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील नऊ बाजार समितीच्यामध्ये निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये सातारा, मेढा, कोरेगाव, वाई, लोणंद, फलटण, वडूज, कराड व पाटण या 9 बाजार समितींचा समावेश आहे. नव्याने समावेश झालेल्या मतदारांची संख्या लक्षात घेता 30 हजार मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

कोण-कोणत्या ठिकाणी कोणाच्यात होणार लढत

जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी बाजार समितीची निवडणूक हि आता जवळ आली असल्याने स्थानिक आमदारांसह खासदारांच्या गटानेही समितीच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे. खासदार उदयनराजे गट विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे गट अशी लढत होणार आहे. कोरेगावात आमदार महेश शिंदे यांचा गट व आमदार शशिकांत शिंदे गट यांच्यात लढत होणार आहे. फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गट व आमदार रामराजे नाईक निंबाळकर गट यांच्यात लढत असेल. कराड येथे आमदार बाळासाहेब पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, डाॅ. अतुल भोसले यांचे उमेदवार रिंगणात असणार आहेत. पाटणला सत्यजितसिह पाटणकर आणि शंभूराज देसाई गटात लढती होणार आहेत.

‘या’ यादिवशी अर्ज दाखल करता येणार दाखल

यामध्ये दि. 27 मार्च ते दि. 3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. 27 मार्च ते 3 एप्रिल अर्ज दाखल करणे. 5 एप्रिल अर्जाची छाननी होणार. 6 एप्रिल ते 20 अर्ज माघारीचा कालावधी आहे. तर प्रत्यक्ष मतदान दि. 28 एप्रिलला होऊन त्यानंतर तीन दिवसांत निकाल जाहीर केला जाणार आहे.