हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Electric Passenger Plane । मित्रानो, सध्या ऑटोमोबाईल मार्केट मध्ये तुम्ही इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक रिक्षा बघितल्या असतील… पण तुम्ही कधी विचार केलाय का? कि आता विमानही इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये येऊ शकत? होय, इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड इतका वाढला आहे कि, आता इलेक्ट्रिक विमानही लाँच झालं आहे. Alia CX300 असं या इलेक्ट्रिक विमानाचे नाव असून ते बीटा टेक्नॉलॉजीज आहे. हे इलेक्ट्रिक विमान खूपच कमी खर्चिक असून तुम्ही अवघ्या ७०० रुपयांत त्यातुन सफर करू शकता. या इलेक्ट्रिक विमानात नेमकी काय काय वैशिष्ट्ये आहेत ते आज आपण जाणून घेऊयात.
एका चार्जमध्ये 460 किमी रेंज- Electric Passenger Plane
विमान वाहतूक इतिहासातील पहिले इलेक्ट्रिक विमान (Electric Passenger Plane) आहे. या महिन्याच्या सुरुवातीला या विमानाने ईस्ट हॅम्प्टनहून अमेरिकेतील जॉन एफ. केनेडी विमानतळावर चार प्रवाशांसह उड्डाण केले. महत्वाची बाब म्हणजे फक्त ३० मिनिटांत विमानाने १३० किलोमीटर अंतर पार केलं. जर हेच अंतर हेलिकॉप्टरने पार करायचं म्हंटल तर अंदाजे १३,८८५ रुपये खर्च आला असता, परंतु हे विमान फुल्ल चार्ज करण्यासाठी आणि उड्डाणासाठीचा खर्च अवघा $८ म्हणजेच ७०० रुपये आहे. CX300 विमान एका चार्जमध्ये तब्बल 250 नॉटिकल माईल्स म्हणजे जवळपास 460 किमी अंतर पार करू शकतं. त्यामुळे हे विमान शहरांदरम्यान किंवा उपनगरात अल्प अंतरासाठी उपयुक्त ठरणार आहे. या इलेक्ट्रिक विमानामुळे भविष्यात हवाई प्रवास प्रदूषणमुक्त, सोप्पा आणि कमी खर्चात होण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रिक विमानाचे (Electric Passenger Plane) आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातून प्रवाशांना एकदम शांत प्रवासाचा अनुभव घेता येईल… . ज्वलन इंजिनचा कोणताही त्रास आणि आवाजाची किरकिर नसल्याने प्रवासादरम्यान प्रवासी आरामात एकमेकांशी बोलू शकतात. बीटा टेक्नॉलॉजीजची स्थापना 2017 मध्ये व्हरमाँट ( Vermont) येथे झाली होती. सध्या त्यांनी $318 दशलक्ष इतकं गुंतवणूक भांडवल उभं केलं आहे, जे उत्पादन, प्रमाणन आणि व्यावसायिक वापरासाठी वापरण्यात येणार आहे. शहरी प्रवासात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने कंपनीने हे इलेक्ट्रिक विमान लाँच केलं आहे. हा प्रकल्प बीटाला आर्चर एव्हिएशनसारख्या इतर इलेक्ट्रिक एव्हिएशन कंपन्यांशी थेट स्पर्धेत आणतो ज्या २०२८ च्या ऑलिंपिकपूर्वी २०२६ पर्यंत लॉस एंजेलिसमध्ये एअर टॅक्सी सेवा सुरू करण्याची योजना आखत आहेत.




