हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात मागील २-३ वर्षांपासून इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Scooter) खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल डिझलच्या खर्चापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या विकत घेत आहेत. बाजारातील हि वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आणत आहेत. यावर्षी सुद्धा इलेक्ट्रिक गाड्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातील अशी परिस्थिती मार्केट मध्ये आहे. तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टीची माहिती असं आवश्यक आहे. नाहीतर नंतर डोक्याला हात लावायची वेळ तुमच्यावर येऊ शकते.. चला तर त्याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.
बॅटरी –
सर्वात आधी जाणून घ्या कि सदर इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये नेमके कोणकोणते फीचर्स मिळतात.. आजकाल अनेक वेळा इलेक्ट्रिक स्कुटरला आग लागल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील, त्यामुळे तुम्ही जी इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणार असाल तिची बॅटरी आग लागणार नाही अशी आहे का ते चेक करा. बॅटरी किती वॅट्सची आहे हे तपासा… तसेच त्या बॅटरीची वॉरंटी किती वर्षाची आहे ते आधी पहा. तसेच आपली स्कुटर चोरीला जाऊ नये यासाठी डिस्क ब्रेक, ऑटो होल्ड आणि अलार्म सिस्टीम असे फीचर्स त्यात आहेत का याचीही खात्री करून घ्या.
इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज– Electric Scooter
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी तिची रेंज किती आहे ते पहा.. कमीत कमी चार्जिंग मध्ये जास्तीत जास्त अंतर पार करणारी स्कुटर नेहमीच ग्राहकांच्या फायद्याची ठरते. त्यामुळे स्कुटरची रेंज चेक करा.. एकदा स्कुटर फुल्ल चार्ज करण्यासाठी किती तास वेळ लागतो आणि त्यानंतर तुम्ही तिच्यावरून किती किलोमीटर प्रवास करू शकता याची व्यवस्थित माहिती जाणून घ्या, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.
टॉप स्पीड बघा –
इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) खरेदी करण्यापूर्वी तिचे टॉप स्पीड तपासून पहा.. कारण जर स्कुटरचे स्पीड कमी असेल तर प्रवासाचे अंतर पार करण्यासाठी तुमचा जास्त वेळ खर्च होईल आणि प्रवासाचा आनंद सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. आजकाल बाजारात अनेक स्वस्त किमतीत स्कुटर उपलब्ध आहेत मात्र त्यांचे टॉप स्पीड खूपच कमी असतंय… त्यामुळे अशा स्कुटर फायदेशीर ठरत नाहीत … कमीत कमी ७० -८० टॉप स्पीड असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कुटर्स खरेदी करणं कधीही चांगलं ठरेल. त्यामुळे स्कुटर खरेदी करण्यापूर्वी टॉप स्पीड आवर्जून चेक करा.