Electric Scooter Under 60000 : 60 हजारांत इलेक्ट्रिक स्कुटर; Hero ची ग्राहकांना खास भेट

Electric Scooter Under 60000
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Electric Scooter Under 60000 । तुम्हीही जर स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणार असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज आम्ही तुम्हला अशा एका इलेक्ट्रिक स्कुटरबाबत सांगणार आहोत जी तुम्ही अवघ्या 59,490 रुपयांत खरेदी करू शकता. होय, Vida VX2 असं या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव असून देशातील आघाडीची दुचाकी वाहन निर्माता कंपनी Hero ने ती तयार केली आहे. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि रेंज याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तर मित्रानो, सध्या इलेक्ट्रीक वाहनांना ग्राहकांकडून मिळणारी पसंती पाहता वाहन निर्माण कंपन्यांही आपल्या नवनवीन गाड्या बाजारात उतरवत आहेत. मात्र इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती जास्त असल्याने अनेकजण इच्छा असूनही ती खरेदी करू शकत नाहीत. म्हणूनच हिरोने खास योजना राबवत Vida VX2 स्कुटर लाँच केली आहे. या स्कूटरला नवीन सब्सक्रिप्शन मॉडेल, Battery-as-a-Service (BaaS) सोबत लाँच केलं आहे. Battery-as-a-Service (BaaS) मॉडेल एक अशी सिस्टीम आहे, ज्यामध्ये ग्राहक स्कूटरची बॅटरी खरेदी करण्याऐवजी भाड्याने घेऊ शकतात. हे मोबाईल डेटा किंवा गॅस सिलेंडर रिफिल करण्यासारखे आहे. या मॉडेलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यामुळे Vida VX2 स्कूटरची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. (Electric Scooter Under 60000)

Hero Vida VX2 चे वैशिठ्य.. Electric Scooter Under 60000

VX2 Go आणि VX2 Plus अशा २ व्हेरियंट मध्ये हि स्कुटर लाँच करण्यात आली आहे. Hero Vida VX2 चं संपूर्ण डिझाईन आणि त्याचे सर्व फिचर Vida Z संकल्पनेवर आधारित असून, ही स्कूटर पहिल्यांदा EICMA मध्ये सादर करण्यात आली होती. Vida V2 च्या तुलनेत कंपनीची VX2 कमी दरात उपलब्ध आहे. किमान खर्चात एखादी चांगली स्कूटर घेण्याचा बेत आखणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. मिनी TFT डिस्प्लेमुळं या स्कूटरला एक स्मार्ट टच मिळत आहे.

Vida VX2 Go मध्ये 2.2kWh ची बॅटरी बसवण्यात आली असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ती 92 किमी पर्यंत अंतर पार करू शकते, तर VX2 Plus मध्ये, कंपनीने 3.4 kWh क्षमतेचा मोठा बॅटरी पॅक दिला आहे. एकदा का हि बॅटरी पूर्णपणे चार्ज केली कि मग तुम्ही V १४२ किलोमीटर पर्यंत प्रवास आरामात करू शकाल. दोन्ही स्कूटरना रिमूव्हेबल बॅटरी दिल्या जात आहेत, ज्या बाहेर काढता येतात आणि घरगुती सॉकेटशी कनेक्ट करून चार्ज करता येतात. कंपनीचा दावा आहे कि या दोन्ही बॅटरी 60 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होऊ शकतात. या इलेक्ट्रिक स्कुटर ला लांब आणि आरामदायी सीट मिळतेय ज्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला कम्फर्ट फील मिळेल. २ लोक आरामात या सीटवर बसू शकतात.

किंमत किती?

Hero Vida VX2 Go च्या या नवीन स्कूटरची किंमत 99,490 रुपये (एक्स-शोरूम) आहे. मात्र हि स्कुटर बॅटरी-अ‍ॅज-ए-सर्व्हिस (BaaS) सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत लाँच करण्यात आल्याने या स्कूटरची किंमत फक्त 59,490 रुपये (Electric Scooter Under 60000) असेल. तर Hero Vida VX2 Plus ची किंमत १०९९९० रुपये असून BaaS अंतर्गत हि इलेक्ट्रिक स्कुटर 64,990 रुपयांत खरेदी करता येईल. BaaS पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील. यामध्ये, तुम्हाला बॅटरी खरेदी करण्याची गरज नाही, तर तुम्ही ती भाड्याने घेऊ शकता आणि ही सेवा फक्त ९६ पैसे प्रति किलोमीटरपासून सुरू होईल. BaaS पॅकेजच्या इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, जर बॅटरी ७०% पेक्षा कमी काम करत असेल तर ती फ्री मध्ये बदलली सुद्धा जाईल.