हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Electric Scooter । भारतीय मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेझ बघायला मिळतेय. दररोज पेट्रोलला होणार खर्च कमी करण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांचा लूकही आकर्षक असल्याने खास करून तरुणांना या गाड्यांची भुरळ पडतेय. वाढती मागणी बघता अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणारी कंपनी जॅलेओ ई मोबिलिटीने नवीन इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. ZELIO Legender Facelift Model असं या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव आहे. या स्कुटरचे स्पीड कमी आहे. मात्र तिची किंमत ग्राहकांना परवडेल अशी आहे. आज आपण या स्कुटरचे खास फीचर्स आणि किंमत सविस्तर जाणून घेऊयात.
१५० किमी रेंज –
ZELIO Legender Facelift Model इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये (Electric Scooter) कंपनीने ६०V / ३०A लिथियम-आयन बॅटरी बसवली आहे. ती एका चार्जवर फक्त १.५ युनिट वीज वापरते. परंतु एका फुल्ल चार्ज झाल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल १५० किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करेल असा दावा केला जातोय. ZELIO Legender Facelift Model इलेक्ट्रिक स्कुटरचे वजन ९८ किलो असून ती १५० किलो पर्यंतचा भार उचलण्यास सक्षम आहे. कंपनीचे म्हणणे आहे की नवीन मॉडेल आजच्या तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन डिझाइन केले आहे. ही स्कूटर स्टायलिश तर आहेच, तसेच ती चालवण्यासही सोपी आहे. स्कुटरच्या समोर टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग-लोडेड सस्पेंशन दिले आहे, ज्यामुळे खराब रस्त्यावरही आरामदायी प्रवास करता येतो.
अन्य फीचर्स – Electric Scooter
इतर फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये स्टायलिश एलईडी हेडलॅम्प, टेललॅम्प डिजिटल डॅशबोर्ड, कीलेस एंट्री, मोबाइल चार्जिंग, अँटी-थेफ्ट डिटेक्शन, प्रॉक्सिमिटी लॉक-अनलॉक, पार्क असिस्ट, फॉलो-मी-होम लाइट्स, एसओएस अलर्ट, क्रॅश आणि फॉल डिटेक्शन, व्हेईकल डायग्नोस्टिक सिस्टम. यांसारखी फीचर्स या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये देण्यात आली आहेत.
किंमत किती?
राहिला प्रश्न तो म्हणजे गाडीच्या किमतीचा, तर या इलेक्ट्रिक स्कुटरची (Electric Scooter) किंमत तिच्या बॅटरी नुसार वेगवेगळी आहे. लेजेंडरच्या जेल बॅटरी मॉडेल ३२AH ची किंमत फक्त ६५,००० रुपये आहे. थियम-आयन बॅटरी ६०V / ३०A असलेल्या मॉडेलची किंमत ७५,००० रुपये आहे. तर ७४V/३२A व्हेरिएंटची किंमत ७९,००० रुपये आहे. या सर्व एक्स-शोरूम किमती आहेत. रस्टी ऑरेंज, ग्लॉसी ग्रीन आणि ग्लॉसी ग्रे अशा ३ आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये हि स्कुटर लाँच केली आहे.




