हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षापासून आपल्या भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Scooter) क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदीला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. वाढती मागणी पाहता अनेक वाहन उतपदक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Zelio Ebikes ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. Zelio X Men असं या स्कुटरचे नाव असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ती 80 किलोमीटर अंतर आरामात पार करेल. महत्वाची बाब म्हणजे या स्कुटरची किंमत फक्त 64 हजार 543 रुपये आहे.
रेंज किती ?
Zelio Ebikes या इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Electric Scooter) बेस व्हेरिएंटमध्ये 60V/32AH लीड-ऍसिड बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 7 ते 8 तासांचा वेळ लागतो. मात्र एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि स्कुटर 55 ते 60 किलोमीटरचे अंतर पार करू शकते. यानंतर या इलेक्ट्रिक स्कुटरचा दुसरा व्हेरियंट 72V/32AH लीड-ऍसिड बॅटरीसह येतो. हि बॅटरी सुद्धा फुल्ल चार्ज होण्यासाठी सुमारे 7 ते 9 तास वेळ ;लागतो मात्र फुल्ल चार्जनंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर 70 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. तर यातील टॉप मॉडेल 60V/32AH लिथियम-आयन बॅटरीसह येते, ज्याला पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ग्राहक 80 किलोमीटरपर्यंतचे अंतर आरामात पार करू शकतात.
अन्य फीचर्स – Electric Scooter
कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक स्कुटर पांढरा, काळा, लाल आणि फिकट हिरव्या रंगात लाँच केली आहे. ही स्कूटर वजनाने खूपच हलकी असल्याचा कंपनीचा दावा आहे. स्कुटरचे वजन 80 किलो आहे परंतु ही स्कूटर 180 किलोपर्यंत लोड उचलू शकते.या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हायड्रोलिक शॉक ॲब्सॉर्बर, अँटी थेफ्ट अलार्म, पार्किंग स्विच, रिअर ड्रम ब्रेक, फ्रंट डिस्क ब्रेक, अलॉय व्हील्स, रिव्हर्स गिअर, यूएसबी चार्जर, सेंट्रल लॉकिंग आणि डिजिटल डिस्प्ले यासारखे फीचर्स मिळतात.
किंमत किती?
गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 64 हजार 543 रुपये आहे. तर तिच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 87 हजार 573 रुपये आहे.